जालना: शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही. मी आग लावलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्यानंतर एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) हे अनुभवी नेते आहेत. मनातली इच्छा ते बोलले नाहीत. शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात याचा मला विश्वास ( Eknath Shinde Should Be Made CM ) आहे, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Central State Minister Raosaheb Danve ) म्हणाले. एकनाथ शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेत मी आग लावत नसून, त्यांच्यात आग लावण्याचं काम माझं नाही. रावसाहेब दानवे यांनी आमच्यात आग लावण्याचं काम करू नये, असं जरी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं असलं तरी मनातली इच्छा ते बोललेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते असून, पुन्हा मुख्यमंत्री आजारी पडल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचा चार्ज दिला पाहिजे, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
किसान रेल्वेचा शुभारंभ
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Minister Rajesh Tope ) यांच्या उपस्थितीत आज जालन्यात नांदेड- हडपसर- पुणे एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेचा ( Kisaan Railway Jalna ) शुभारंभ करण्यात आला. या किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 350 टन कांदा आसाममध्ये पाठवण्यात आला. कमी वाहतूक खर्च आणि कमी वेळेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेतीमाल बाहेरील राज्यात पाठवता येणार आहे. त्यामुळे किसान रेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. दरम्यान 1 हजार कोटी रुपये खर्चून औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करणार असून, या दुहेरी मार्गाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती देखील दानवे यांनी दिलीय. तर दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड मार्गाचं दुहेरीकरण केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. जालना- खामगाव या रेल्वेमार्गासाठी अंतिम सर्व्हे करण्याचं काम सुरू आहे, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. तर, मुंबई- नागपूर बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाच काम सुरू असून, औरंगाबादमध्ये कार्यालयाचं काम सुरू करण्यात आलं आहे. आवश्यक जागा अधिग्रहण करण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल, असंही दानवे यांनी सांगितलं.