अकोला - Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी Congress Leader Rahul Gandhi यांची भारत जोडो यात्राने अकोला जिल्ह्यात प्रवेश केला आहे. अभिनेत्री रिया सेन आज काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सामील Riya Sen in Bharat Jodo Yatra झाल्या. पक्षाचे खासदार राहुल गांधी आणि इतरांनी आज पातूर येथून महाराष्ट्र यात्रेला सुरुवात केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्राने अकोला जिल्ह्यात प्रवेश केला आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर येथील साईबाबा जिनिंग फॅक्टरी येथे बुधवारी राहुल गांधींच्या यात्रेचा मुक्काम होणार आहे. आज सकाळी पातूरातून पदयात्रेला सुरूवात होणार आहे. यासोबतच 17 नोव्हेंबरला राहुल गांधी यांचा मुक्काम बाळापुर तालुक्यातील बाग फाटा येथे असेल. राहुल गांधींच्या पदयात्रेच्या मार्गावरील सर्व ठिकाणी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. अकोला जिल्ह्यात राहुल गांधींची यात्रा पातुर, देऊळगाव, वाडेगाव, बागफाटा, बाळापूर या मार्गे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला जाणार आहे.
बुलढाणा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. शेगावमध्ये सायंकाळी पाच वाजता त्यांची सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, अमरावती विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सभास्थळाची पाहणी केली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी पोलीस प्रशासनाकडून ठेवण्यात आली आहे. राहुल गांधी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर वारकऱ्यांसोबत ते पावली काढणार आहेत. दुपारचे भोजन करणार आहेत. संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सभा होणार आहे.
यापूर्वीही अनेक अभिनेते, अभिनेत्री यांच्यासह कलाकारांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला आहे. आज रिया सेन भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.