ETV Bharat / state

अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने निलंबित; सरकारी कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप - अंबडच्या तहसीलदार

तालुक्यातील गोदावरी गंगेच्या पात्रात असलेल्या वाळूचा अनअधिकृतपणे लिलाव करण्याची परवानगी देणे , परवानगीपेक्षा जास्त वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदाराकडे दुर्लक्ष करणे, गौण खनिजांची वसुली न करणे, जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यकतेपेक्षा जास्त निधी मागून त्या निधीच्या वापर न करता तो पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना परत करणे, असे अनेक आरोप मेने यांच्यावर आहेत.

tehsil
तहसीलदार मनीषा मेने
author img

By

Published : Nov 29, 2019, 9:52 PM IST

जालना - अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने यांना सरकारी कामांमध्ये हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाखाली निलंबीत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

तालुक्यातील गोदावरी गंगेच्या पात्रात असलेल्या वाळूचा अनअधिकृतपणे लिलाव करण्याची परवानगी देणे , परवानगीपेक्षा जास्त वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदाराकडे दुर्लक्ष करणे, गौण खनिजांची वसुली न करणे, जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यकतेपेक्षा जास्त निधी मागून त्या निधीच्या वापर न करता तो पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना परत करणे, असे अनेक आरोप मेने यांच्यावर आहेत. अंबड तालुक्यातील आपेगाव, कुरण, शहागड, या ठिकाणच्या गोदावरी पात्रातील वाळूचे अवैधरित्या उत्खनन होत असतानादेखील मेने यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर, उपविभागीय अधिकाऱ्यांनी पथक नेमून याची पाहणी केली असता, जप्त केलेले वाळू साठे नदीपात्रात पसरवून दिले असल्याची खोटी माहिती दिली. त्यामुळे, शासनाच्या खनिज उत्पन्नाचे नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे.

2018च्या दुष्काळी परिस्थितीत मेने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 27 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मागितला होता. या मागणीनुसार हा पूर्ण निधी जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै 2019 मध्ये तहसीलदारा कार्यालयाकडे वर्ग केला होता. हा निधी अतिरिक्त होत असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत मेने यांना खुलासा मागितला. तेव्हा, मेने यांनी सुमारे 18 कोटींचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे परत केला. त्यामुळे, कोणतेही नियोजन नसताना एवढा निधी मागितला कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून मेने यांनी दिलेला खुलासा असमाधानकारक असल्याचे त्यांच्या निलंबन पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - दुष्काळ दौऱ्यावेळी दांडी मारणारा ग्रामविकास अधिकारी निलंबित

तसेच, प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या कामात पोर्टलवर देण्यात येणारी माहिती न भरणे, फेरफारीची कामे बाकी असणे यासह अनेक कारणांचा निलंबनपत्रात समावेश आहे. दरम्यान, निलंबन काळामध्ये मनीषा मेने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. तसेच यादरम्यान कुठलीही खासगी नोकरी करू नये, असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.

Intro:अंबड तालुक्यातील गोदावरी गंगेच्या पात्रात असलेले वाळूचे लिलाव दिलेले असतानाही पुन्हा त्या वाळूचे लिलाव करण्याची परवानगी देणे , ठेकेदाराने दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त वाळू उपसा केल्या नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून नियंत्रणात ठेवणे ,गौण खनिजांची वसुली न करणे याच सोबत ,शेतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यकतेपेक्षा जास्त निधी मागून या निधीच्या वापर न करता तो पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना समर्पित करणे, या आणि अन्य सरकारी कामांमध्ये हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने यानातडकाफडकी निलंबित केले आहे .
संदर्भात जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नुकताच त्यांचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविला होता.
अंबड तालुक्यातील आपेगाव, कुरण, शहागड, आदि ठिकाणच्या गोदावरी पात्रातील वाळूचे उत्खनन अवैधरित्या होत असताना देखील श्रीमती मेने यांनी दुर्लक्ष केले .त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पथक नेमून याची पाहणी केली असता जप्त केलेले वाळू साठे नदीपात्रात पसरवून दिले आहेत, अशी माहिती दिली. त्यामुळे शासनाच्या खनिज उत्पन्नाचे नुकसान झाले आहे ,सोबतच वाळूचे अधिक उत्खनन होत असताना दुसऱ्या ठेकेदाराला उत्खननाची परवानगी दिली .त्याच सोबत सन 2018 च्या दुष्काळी परिस्थितीमध्ये श्रीमती मेने यांनी कडे 27 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मागितला होता या मागणीनुसार हा पूर्ण निधी जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै 2019 मध्ये तहसीलदारांकडे वर्ग केला होता, मात्र हा निधी अतिरिक्त होत असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत तहसीलदारांना खुलासा मागितला आणि तहसीलदारांनी सुमारे 18 कोटी निधी जिल्हाधिकाऱ्यांना समर्पित केला. त्यामुळे कोणतेही नियोजन नसताना एवढा निधी मागितला कशासाठी ?असा प्रश्न उपस्थित करून श्रीमती मेने यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याचेही या निलंबन पत्रात म्हटले आहे .तसेच प्रधानमंत्री सन्मान योजना या कामात पोर्टलवर देण्यात येणारी माहिती न भरणे, फेरफार ची कामे बाकी असणे ,या आणि अन्य अनेक कारणांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान निलंबन काळामध्ये श्रीमती मनीषा मेने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहावे, तसेच यादरम्यान कुठलाही खाजगी नोकरी करू नये ,केल्यास दोषी ठरविण्यात येईल असा आदेशही या देण्यात आला आहे.Body:Foto
मनीषा मेनेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.