ETV Bharat / state

बदनापूरमध्ये भरधाव जाणाऱ्या वाहनाचे टायर फुटल्याने अपघात; चार जण जखमी - jalna covid 19

लॉकडाऊनमध्ये अडकून पडल्याने घरी जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेवून पुण्याहून जालना मार्गे नागपूरला जाणाऱ्या चारचाकी गाडीचा समोरचा टायर पंक्चर झाल्याने बदनापूरजवळ अपघात झाला.

Accident
बदनापूरमध्ये भरधाव जाणाऱ्या वाहनाचे टायर फुटल्याने अपघात; चार जण जखमी
author img

By

Published : May 8, 2020, 8:49 PM IST

बदनापूर (जालना) - लॉकडाऊनमध्ये अडकून पडल्याने घरी जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेवून पुण्याहून जालनामार्गे नागपूरला जाणाऱ्या चारचाकी गाडीचा समोरचा टायर पंक्चर झाल्याने बदनापूरजवळ अपघात झाला. यात कारमधील चार जण जखमी झाले. टायर पंक्चर झाल्यानंतर कारची चार वेळा पलटी झाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नागपूर येथील विनोद मनोहरराव आरमारकर (वय 50) आणि राजेंद्रकुमार दिनेशचंद गोयल यांच्या मुली पुणे येथे शिक्षण घेत आहेत. राज्यात कोरोना प्रदुभवामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने मुली पुण्यात अडकल्याने त्यांना घरी आणण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली. विनोद आरमारकर, राजेंद्रकुमार गोयल, सानिध्या विनोद आरमारकर (वय 24) आणि सोनाक्षी राजेंद्रकुमार गोयल (वय 25) हे 8 मे रोजी सकाळी पुण्याहून औरंगाबाद-जालना मार्ग नागपूरला सुझुकी कारने (सीजी 12 पी 0219) निघाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.