ETV Bharat / state

जालना : दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी नोटीस

जालना तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी १७७८ कर्मचाऱ्यांना उपस्थित राहाण्याचे आदेश होते. ५६ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाला दांडी मारली आहे. या कर्मचाऱ्यांना १ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

author img

By

Published : Jan 1, 2021, 10:17 AM IST

Updated : Jan 1, 2021, 10:34 AM IST

जालना तहसील कचेरी
Jalna Tahasil

जालना - तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी १७७८ कर्मचाऱ्यांना उपस्थित राहाण्याचे आदेश होते. ५६ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाला दांडी मारली आहे. या कर्मचाऱ्यांना १ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

नोटीस बजावणार
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील सेंट मेरी हायस्कूलमध्ये गुरुवारी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थी तहसीलदार शितल बंडगर यांनी या कर्मचाऱ्यांना मतदाना विषयी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाला 56 कर्मचारी गैरहजर होते. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी गैरहजर राहिल्याने याची दखल तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी घेतली आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

अशी होती कर्मचाऱ्यांची संख्या
मतदान केंद्राध्यक्ष एकूण 445, उपस्थित 428, अनुपस्थित 17
मतदान प्रशिक्षणाचे तीन कक्षांमध्ये नियोजन करण्यात आले होते.
मतदान कक्ष 1 - उपस्थित 429, गैरहजर 15, एकूण 444
मतदान कक्ष 2 - उपस्थित 431, गैरहजर पंधरा, एकूण 446
मतदान कक्ष 3 - 434 कर्मचारी, गैरहजर नऊ, एकूण 443
एकूण 1778 पैकी 56 कर्मचारी गैरहजर
1722 कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.

Last Updated : Jan 1, 2021, 10:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.