ETV Bharat / state

जालन्यात तिजोरी चोरट्याला २४ तासात अटक, सदर बाजार पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Nov 18, 2020, 4:42 PM IST

सलग सुट्ट्या आल्याची संधी साधून एका खासगी अर्थपुरवठा करणाऱ्या कंपनीची तिजोरी चोरट्यांनी पळवली होती. ही घटना काल उघडकीस आली. याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी २४ तासात एका आरोपीला अटक केली आहे. किशोरसिंग रामसिंग टाक, असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

Private company vault theft jalna
तिजोरी

जालना - सलग सुट्ट्या आल्याची संधी पाहून एका खासगी अर्थपुरवठा करणाऱ्या कंपनीची तिजोरी चोरट्यांनी पळवली होती. ही घटना काल उघडकीस आली. याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी २४ तासात एका आरोपीला अटक केली आहे.

भोकरदन नाका परिसरात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बँक क्रेडिट अ‌ॅक्सिस ग्रामीण फायनान्स लिमिटेड या कंपनीचे कार्यालय आहे. व्यवस्थापक म्हणून मनोज सांडू तडवी येथे कार्यरत आहेत. १४ तारखेला सायंकाळी कंपनीचे कार्यालय बंद झाले. त्यानंतर, दोन दिवसांच्या सुट्ट्या होत्या. त्यामुळे, कंपनीत कोणी फिरकले नाही. १६ तारखेला सकाळी अकरा वाजता कंपनीचे कार्यालय उघडल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत व्यवस्थापकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार कार्यालयातून गोदरेज कंपनीची तिजोरी, ३ हजार रुपये नगद आणि ५० हजार रुपयांचे १० सॅमसंग कंपनीचे टॅब चोरीला गेले होते.

या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी कालपासून तपासाची चक्रे फिरवल्यानंतर कंपनीची तिजोरी चंदंनजिरा पोलीसठाण्याच्या हद्दीमध्ये आढळून आल्याचे समोर आले. याबाबत चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांनी सदर बाजार पोलिसांना कळवले. दरम्यानच्या काळात सदर बाजार पोलिसांनी जालन्यातील सराईत गुन्हेगार किशोरसिंग रामसिंग टाक याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने काही साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, चोरी गेलेल्या रकमेमधून १ हजार २०० रुपये आणि कंपनीची काही कागदपत्रे पोलिसांच्या स्वाधीन केली. पळवून नेलेली तिजोरी ही उघडत नसल्यामुळे ती तोडण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, सुधीर वाघमारे, यांनी केला आहे.

हेही वाचा -मंठा अर्बन को-ऑपरेटिव बँकेवर आरबीआयचे निर्बंध; बँकेसमोर गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.