ETV Bharat / state

जालना: व्याजाच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून

काही दिवसांपूर्वी परतुर येथील व्यापारी कुंदन खंडेलवाल याचा सन्मित्र कॉलनीच्या मैदानावर अज्ञातांनी भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोळी मारून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांत तपास पूर्ण आरोपी राहुल रामजीवन खंडेलवाल उर्फ रोहित शर्मा व अन्य दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जालन्यात खून
author img

By

Published : Sep 2, 2019, 11:50 PM IST

जालना- परतूर येथे 31ऑगस्ट रोजी कुंदन खंडेलवाल या तरुणाचा व्याजाच्या व्यवहाराच्या वादातून आणि अन्य कारणांवरून खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्तूल आणि कुंदनची पळवून नेलेली सोन्याची साखळी जप्त केली आहे.

आरोपींना अटक केल्यावर प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकारी

परतुर येथील व्यापारी कुंदन खंडेलवाल याचा सन्मित्र कॉलनीच्या मैदानावर अज्ञातांनी भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोळी मारून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांत तपास पूर्ण केला आणि या प्रकरणातील आरोपी राहुल रामजीवन खंडेलवाल उर्फ रोहित शर्मा यास ताब्यात घेतले. त्याने अन्य दोन मित्रांच्या सहाय्याने कुंदन खंडेलवालचा खून केल्याची कबुली दिली आहे. घडलेल्या प्रकरणाबद्दल माहिती अशी की, कुंदन खंडेलवाल आणि रोहित शर्मा (खंडेलवाल) हे एक दुसऱ्याचे शेजारी आहेत तसेच ते जवळचे मित्रही आहेत. त्यांच्यामध्ये पैशाच्या देण्याघेण्याच्या कारणावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होते .ते दोघे मित्रही असल्यामुळे दिनांक 31ऑगस्ट रोजी राहुल याने पृथ्वीराज आंभोरे आणि अनिल सोनवणे हे तिघे मिळून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भेटले. तेथे त्यांनी नियोजन करून याप्रकरणातील मयत कुंदन खंडेलवाल याला तिथे बोलावून घेतले व गोळ्या घालून त्याचा खून केला. त्यानंतर तिघेही मोटरसायकल घेऊन पसार झाले. कुंदन खंडेलवाल याचा व्याजाच्या व्यवहाराचा धंदा असल्याचेही समोर आले आहे. या पैशातून आणि अन्य काही कारणांमधून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी पृथ्वीराज देविदास अंभोरे (वय19), अनिल विठ्ठलराव सोनवणे (वय26) यांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली बुलेट मोटरसायकल, गळ्यातील सोन्याची साखळी आणि एक देशी बनावटीचे पिस्तोल पोलिसांनी जप्त केले आहे. एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी देखील काल परतुरला जाऊन घटनेची माहिती घेतली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या पथकाने अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गेश राजपूत, शेखर कांबळे, गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, विलास चेके, किरण मोरे ,दुर्गेश राजपूत, आदि कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

Intro:परतूर येथे 31 ऑगस्ट रोजी कुंदन खंडेलवाल या तरुणाचा खून व्याज बटाट्याच्या व्यवहारावरून आणि अन्य कारणांवरून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्तूल आणि कुंदनची पळवून नेली सोन्याची साखळी जप्त केले आहे.

Body:परतुर येथील व्यापारी कुंदन खंडेलवाल याचा सन्मित्र कॉलनी च्या मैदानावर अज्ञात इसमांनी भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोळी मारून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसात तपास पूर्ण केला आणि या प्रकरणातील आरोपी राहुल रामजीवन खंडेलवाल उर्फ रोहित शर्मा यास ताब्यात घेतले. त्याने अन्य दोन मित्रांच्या सहाय्याने कुंदन खंडेलवाल चा खून केल्याची कबुली दिली आहे .या घडलेल्या प्रकरणाबद्दल ची माहिती अशी की, कुंदन खंडेलवाल आणि रोहित शर्मा (खंडेलवाल) हे एक दुसऱ्याचे शेजारी आहेत तसेच ते जवळचे मित्रही आहेत. त्यांच्यामध्ये पैशाच्या देण्याघेण्याच्या कारणावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होते .ते दोघे मित्रही असल्यामुळे दिनांक 31 ऑगस्ट रोजी राहुल याने पृथ्वीराज आंभोरे आणि अनिल सोनवणे असे तिघे मिळून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भेटले .तेथे त्यांनी नियोजन करून याप्रकरणातील मयत कुंदन खंडेलवाल याला तिथे बोलावून घेतले कुंदन हा मोटरसायकलवर आल्यानंतर हे तिघेजण आणि कुंदन असे चौघे मिळून सन्मित्र कॉलनी येथील मैदानावर गेले. तेथे कुंदन हा राहुलची आणि अनिल शी गप्पा मारत असतानाच कुंदनच्या डोक्याला पिस्टल लावून गोळी मारली. त्यावेळी तो खाली पडला असता पृथ्वीराज अंभोरे यांनी कुंदनच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतली. आणि त्यानंतर तिघेही ही बुलेट मोटरसायकल वर बसून पसार झाले. कुंदन खंडेलवाल याचा व्याजी व्यवहाराचा धंदा असल्याचेही समोर आले आहे. या पैशातून आणि अन्य काही कारणांमधून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले .याप्रकरणी पोलिसांनी पृथ्वीराज देविदास अंभोरे 19वर्षे रा. जिल्हा परिषद शाळे जवळ परतुर अनिल विठ्ठलराव सोनवणे 26 रा.माने गल्ली परतुर ,असे आरोपी असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली बुलेट मोटरसायकल, गळ्यातील सोन्याची साखळी आणि एक देशी बनावटीचे पिस्टल पोलिसांनी जप्त केले आहे .आरोपींकडे असलेल्या मोबाईलचा चुराडा केला आहे. एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी देखील काल परतूरला जाऊन घटनेची माहिती घेतली होती.त्या त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या पथकाने अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ,दुर्गेश राजपूत, शेखर कांबळे, गोकुळसिंग कायटे ,कृष्णा तंगे,विलास चेके, किरण मोरे ,दुर्गेश राजपूत, आदि कर्मचाऱ्यांनीही कामगिरी केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.