ETV Bharat / state

पत्नीला खूश ठेवण्यासाठी नागरिकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक

पत्नीला खूश ठेवण्यासाठी नागरिकांना गंडा घालणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश शिंदे (वय 22 ) असे आरोपीचे नाव आहे. सदर बाजार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

author img

By

Published : Apr 30, 2022, 7:47 AM IST

Updated : Apr 30, 2022, 8:11 AM IST

man arrested for looting people by atm
शैलेश शिंदे अटक जालना

जालना - पत्नीला खूश ठेवण्यासाठी नागरिकांना गंडा घालणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश शिंदे (वय 22 ) असे आरोपीचे नाव आहे. सदर बाजार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शैलेश हा एटीएममधून पैसे काढायला येणाऱ्या लोकांना पैसे काढून देण्याच्या बहाणे त्यांची फसवणूक करायचा.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - Father Son Drowned In Pool : जालना : पोहण्यास गेलेल्या बाप, लेकाचा तलावात बुडून मृत्यू

शैलेश हा मूळचा लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील रहिवासी आहे. त्याचे आई - वडील मोलमजुरी करतात. काही वर्षांपूर्वी त्याचे आईवडील नाशिकमध्ये कामासाठी गेले असताना शैलेश देखील त्यांच्यासोबत गेला. या दरम्यान त्याची जुगार खेळणाऱ्या मुलांशी मैत्री झाली आणि एका मुलीच्या तो प्रेमातही पडला. घरच्यांची परवानगी नसताना त्याने त्या मुलीसबोत लग्न करून परत लातूर गाठले. मात्र, घर चालवण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने, तसेच प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी त्याने लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली.

शैलेश हा वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन एटीएमबाहेर उभा राहायचा. भोळी व्यक्ती एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आली की तिला, मी पैसे काढून देतो, असे सांगून कार्डची माहिती विचारायचा. त्यानंतर व्यक्तीच्या हातात दुसरेच एटीएम देऊन तिच्या एटीएममधून पैसे काढून घ्यायचा. अशा प्रकारे शैलेशने जालन्यातील 4 ते 5 जणांना गंडा घातला आहे. पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी या महाभागाला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा - Gutkha Seized By Jalna LCB : जालन्यात कर्नाटकातून येणारा ५४ लाखांचा गुटखा कंटेनरसह जप्त.. एलसीबीची कारवाई

Last Updated : Apr 30, 2022, 8:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.