ETV Bharat / state

कौतुकास्पद..! ३ वर्षाच्या मुलाला आजोबाकडे सोडून जालन्यातील 'या' दाम्पत्याचा कोरोनाविरुद्ध लढा

कंडारी येथे मागील २० वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य असलेले जगन्नाथ ढाकणे यांचा मुलगा रामप्रसाद ढाकणे व सून दिपाली ढाकणे हे पुणे येथे आरोग्यसेवेत कार्यरत आहेत. रामप्रसाद हे पुणे येथील वेलस्प्रिंग रुग्णालयात आरोग्य सेवा बजावतात तर त्यांची पत्नी दिपाली या पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात आरोग्य सेवेत आहेत.

dhakne family left child kandari
ढाकणे दांपत्य
author img

By

Published : Apr 12, 2020, 12:35 PM IST

जालना- देशासह राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. त्यामुळे, कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी राज्यातील पोलीस, आरोग्य सेवक व प्रशासकीय यंत्रणा संयुक्तपणे अहोरात्र काम करत आहेत. नुकताच याचा प्रत्यय आला आहे. बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द येथील ढाकणे दांपत्य हे आरोग्य सेवेत कार्यरत आहे. त्यांनी आपल्या ३ वर्षाच्या मुलाला त्याच्या आजोबाकडे सोडले असून आपले कर्तव्य बजावत आहेत.

कंडारी येथे मागील २० वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य असलेले जगन्नाथ ढाकणे यांचा मुलगा रामप्रसाद ढाकणे व सून दिपाली ढाकणे हे पुणे येथे आरोग्यसेवेत कार्यरत आहेत. रामप्रसाद हे पुणे येथील वेलस्प्रिंग रुग्णालयात आरोग्य सेवा बजावतात तर त्यांची पत्नी दिपाली या पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात आरोग्य सेवेत आहेत. दीड महिन्यांपूर्वीच जेव्हा पुणे येथे पहिला कोरोना रुग्ण सापडला तेव्हापासून ढाकणे दांपत्य केारोना रुग्ण सेवेत रुजू झालेले आहेत.

या दांपत्याने कंडारी येथील त्यांचे वडील जगन्नाथ ढाकणे यांच्याकडे आपल्या ३ वर्षाच्या कैवल्य नावाच्या मुलाला ठेवले असून ते पुणे येथे आपले कर्तव्य बजावत आहे. सुरुवातीच्या काळात पिंपरी-चिंचवड भागातच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. परंतु, ढाकणे दांपत्यासारख्या आरोग्यसेवकांमुळेच येथील रुग्णसंख्या घटलेली आहे. ज्या वेळेस या ठिकाणी रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती, त्या वेळेस मुंबई-पुणे व तत्सम शहरातून कोरोनाच्या भितीमुळे सर्वसामान्य नागरिक गावाकडे जात होते. मात्र, कंडारी सारख्या छोट्याशा गावातील हे दांपत्य पुणे येथे थेट कोरोना रुग्णांना रुग्णसेवा देत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हेही वाचा- दारूच्या अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पारध पोलिसांवर जमावाचा हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.