ETV Bharat / state

घनसांगी तालुक्यात सात लाखांच्या गुटख्याची होळी, एक आरोपी अटकेत - जालन्यात गुटखा जप्त

स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना घनसांगी तालुक्यातील मौजे राणी उंचेगाव येथे उंचेगाव ते घनसावंगी रस्त्यावरील एका गोदाममध्ये शासनाने बंदी घातलेला गुटखा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार धाड टाकत पोलिसांनी ७ लाख ११ हजारांचा गुटखा जप्त करत आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमक्ष जाळून नष्ट करण्यात आला.

गुटख्याची होळी
author img

By

Published : Aug 7, 2019, 12:12 PM IST

जालना - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घनसांगी तालुक्यामध्ये राज्यात बंदी असलेला गुटका साठवून ठेवलेल्या एका गोदामवर धाड टाकत ७ लाख ११ हजारांचा गुटखा जप्त केला. तसेच हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमक्ष जाळून नष्ट करण्यात आला.

सात लाखांच्या गुटख्याची होळी

स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना घनसांगी तालुक्यातील मौजे राणी उंचेगाव येथे उंचेगाव ते घनसावंगी या रस्त्यावर असलेल्या अक्कस एक्वा वॉटर फिल्टर प्लांटच्या गोदाममध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने या शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांनी मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास या गोदामावर धाड टाकली. त्यावेळी तिथे अब्दुल रियाज अब्दुल रशीद शेख (35) हा आरोपी उपस्थित होता. या गुटख्याविषयी त्याला विचारले असता त्याने हा गुटका विक्रीसाठी आणला असल्याची कबुली दिली.

दरम्यान पोलिसांनी राजनिवास पान मसाला, 21 पिवळ्या गोळ्यांमध्ये जाफरानी जर्दा, तसेच गोवा गुटखा अशा विविध प्रकारच्या गुटख्याच्या 21 पांढऱ्या बोऱ्या जप्त केल्या. या गुटख्यांची बाजारात ७ लाख ११ हजार रुपये एवढी किंमत होती. अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्रज्ञा सुरवसे यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान या सर्व गुटख्याची पोलीस अधीक्षक चैतन्य, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, श्रीमती प्रज्ञा सुरवसे, श्री शुक्ला यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात हा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला.

Intro:स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी बंदी असलेला गुटका साठवून ठेवलेल्या गोदामावर धाड टाकून सात लाख अकरा हजारांचा गुटखा जप्त केला .तसेच हा गुटका अन्न व औषध प्रशासनाच्या धिकार्‍यांना समक्ष जाळून टाकण्यात आला.

Body:स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना घनसांगी तालुक्यातील मौजे राणीउचेगाव येथे उंचेगाव ते घनसावंगी या रस्त्यावर असलेल्या अक्कस एक्वा वॉटर फिल्टर प्लांट च्या गोदामांमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटका साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली .त्या अनुषंगाने या शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांनी मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास या गोदामावर छापा मारला. त्यावेळी तिथे अब्दुल रियाज अब्दुल रशीद शेख वय 35 हा आरोपी उपस्थित होता. या गुटक्या विषयी त्याला विचारले असता त्याने हा गुटका विक्रीसाठी आणलाअसल्याची कबुली दिली.
दरम्यान पोलिसांनी 21 पांढऱ्या बोरी मध्ये राजनिवास पान मसाला ,21 पिवळ्या गोळ्यांमध्ये जाफरानी जरदा तसेच गोवा गुटका अशा विविध प्रकारच्या गुटख्याच्या बोऱ्या जप्त केल्या. या गुटख्याची बाजारांमध्ये सात लाख अकरा हजार रुपये एवढी किंमत होते.
अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्रज्ञा सुरवसे यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दरम्यान या सर्व गुटख्याची पोलीस अधीक्षक चैतन्य ,अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई ,श्रीमती प्रज्ञा सुरवसे श्री शुक्ला यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात हा गुटका जाळून नष्ट करण्यात आला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.