ETV Bharat / state

जालन्यात 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; चारजण ताब्यात - जालना सामूहिक बलात्कार

जालन्यात एका ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalna physical abused  jalna 50 years old physical abused  जालना सामूहिक बलात्कार  जालना लेटेस्ट न्युज
जालन्यात 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; चारजण ताब्यात
author img

By

Published : May 5, 2020, 7:52 AM IST

जालना - चार नराधमांनी ५० वर्षीय महिलेवर नदीपात्रात सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुंडलिका नदीच्या पात्रतील सादक बाबा दर्ग्याजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली असून चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

जुना आणि नवीन जालना अशा दोन्ही शहराच्या मध्य भागातून कुंडलिका नदी वाहते. या नदीच्या काठावर सादक बाबा दर्गा आहे. चारही नरधमांनी पीडित महिलेला एकटे गाठून तिच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत तिला त्याठिकाणी नेले. त्यानंतर चौघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, चारही आरोपी नवीन जालन्यातील गांधीनगर भागातील राहणारे आहेत. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोड करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.