ETV Bharat / state

जालन्यात व्यापारी महासंघाचा 'जनता कर्फ्यू'; दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा चांगला प्रतिसाद - janata curfew jalna

कोरोनाची वाढती रुग्णसंख्येला शहरात आणि मोंढ्यात होणारी गर्दी हे कारण असू शकते. असे ग्राह्य धरून ही साखळी तोडण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. शहरात विविध व्यावसायिकांच्या सुमारे 62 संघटना आहेत. या सर्व संघटनांनी या 'जनता कर्फ्यू'ला पाठिंबा दिला आहे. मात्र, या बंदमध्ये दारूची दुकाने खुली आहेत.

3 days janta curfew by businessman federation in jalna during corona crisis
जालन्यात व्यापारी महासंघाचा 'जनता कर्फ्यू'; दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा प्रतिसाद
author img

By

Published : Jun 20, 2020, 4:39 PM IST

Updated : Jun 20, 2020, 4:47 PM IST

जालना - शहर व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवारपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. पहिल्या दिवसाच्या या कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आज (शनिवारी) दुसऱ्या दिवशी त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शनिवारी नवीन आणि जुना जालना भागातील किरकोळ किराणा दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आणि बाजारपेठ बंद होती.

जालन्यात व्यापारी महासंघाचा 'जनता कर्फ्यू'; दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा चांगला प्रतिसाद

कोरोनाची वाढती रुग्णसंख्येला शहरात आणि मोंढ्यात होणारी गर्दी हे कारण असू शकते. असे ग्राह्य धरून ही साखळी तोडण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. शहरात विविध व्यावसायिकांच्या सुमारे 62 संघटना आहेत. या सर्व संघटनांनी या 'जनता कर्फ्यू'ला पाठिंबा दिला आहे. मात्र, या बंदमध्ये दारूची दुकाने खुली आहेत.

आज (शनिवारी) दुपारनंतर अमावस्येला सुरुवात झाली आहे. तसेच उद्या (रविवारी) सूर्यग्रहण आहे. त्यामुळे अनेक व्यापारी या काळात व्यवसाय करणे अनिष्ट समजतात. कृषी उत्पन्न बाजार समितीला दर अमावस्येला सुट्टी असते. त्यामुळे मोंढ्यातील उलाढाल मोठ्या प्रमाणात कमी असते. या सर्व बाबी लक्षात घेता रविवारी बाजारपेठ बंद राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा - मेळघाटात आणखी एक अघोरी कृत्य; २६ दिवसीय चिमुकलीच्या पोटावर दिले चटके

दरम्यान, शहरात कोणतीही दुकाने उघडल्या जाऊ नयेत, म्हणून व्यापारी महासंघाचे पदाधिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये ठाण मांडून बसले आहेत. जर कुठे दुकाने उघडी दिसली तर ती पोलिसांच्या माध्यमातून बंद करण्याच्या सूचना देत आहेत.

नगरपालिकेच्या वतीने शहरात निर्जंतुकीकरण ही करण्यात येत आहे. आठ दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले भाजीमंडईतील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात हटवली होती. त्यामुळे तिथे घाण साचली होती. या घाणीचे निर्जंतुकीकरण आज (शनिवारी) करण्यात आले. तसेच सावरकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ सुरू आहे. ही वर्दळ लक्षात घेता चौकामध्ये फवारणी करण्यात आली.

Last Updated : Jun 20, 2020, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.