ETV Bharat / state

राजुरी स्टील चोरी प्रकरण: झिंग्या गँगमधील तिघांना अटक, 65 हजारांचे पितळ जप्त - 3 arrested zinga gang

पोलिसांनी याप्रकरणी झिंगा गँगच्या 3 आरोपींसह चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी 3 खरेदीदारांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले 65 हजाराचे पितळी साहित्य आणि चोरीमध्ये वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.

Zinga gang 3 people arrested
Zinga gang 3 people arrested
author img

By

Published : Jun 15, 2020, 6:07 PM IST

जालना - जालना औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या राजुरी स्टील या सळई तयार करणाऱ्या कारखान्यामधून 9 जूनला पीतळाचे रॉड आणि बेरिंग चोरीला गेले होते. चंदनझिरा पोलिसांनी आज झिंग्या गँगकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

राजुरी स्टील कारखान्याचे व्यवस्थापक अभिजीत खरात यांनी 12 जूनला चंदनझिरा पोलीस ठाण्यात कंपनीच्या आवारातून 9 जूनला पितळाचे बेरिंग रॉड आदी साहित्य चोरी गेल्याची तक्रार नोंदविली होती. या तक्रारीची दखल घेत चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कोठाळे यांनी आरोपींचा शोध घेतला असता झिंगा गँगचा प्रमुख सचिन झीगे याला औद्योगिक वसाहतीमधील एका हॉटेलातून ताब्यात घेण्यात आले. आणि त्याला विचारपूस केली असता त्याने अन्य दोन साथीदार मंगेश प्रकाश मुळे (रा.विठ्ठल नगर चंदनझिरा) आणि विकास ज्ञानेश्वर भुंबर (रा.भाग्यनगर) यांच्या मदतीने चोरी केली असल्याचे कबूल केले. हे साहित्य चोरीचे असल्याचे लक्षात येऊ नये म्हणून थोडे थोडे करून शेख फिरोज शेख इस्माईल (रा. साईनाथ नगर) जयश अब्दुल करीम शेख (रा. बागवान नगर) आणि जुबेर खान चांद खा पठाण (रा. एकता नगर चंदनझिरा) यांना विकल्याचे सांगितले.

पोलिसांनी याप्रकरणी झिंगा गँगच्या सदर 3 आरोपींसह चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी 3 खरेदीदारांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले 65 हजाराचे पितळी साहित्य आणि चोरीमध्ये वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.

पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घोडे, कर्मचारी अनिल काळे, प्रभाकर वाघ, गोविंद पवार, लक्ष्मण शिंदे, आदींनी ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.