ETV Bharat / state

जालना : वाळू तस्करीप्रकरणी जप्त केलेले दोन ट्रक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून गायब

काल अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्या या निलंबनानंतर या प्रकरणात गुंतलेल्या अनेक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

jalna
जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Nov 30, 2019, 8:40 PM IST

जालना- जिल्ह्यातील वाळू तस्करी ही काही नवीन नाही. यापूर्वी देखील भोकरदनच्या महिला तहसीलदार या वाळूच्या तस्करी प्रकरणी निलंबित झाल्या होत्या. काल अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्या या निलंबनानंतर या प्रकरणात गुंतलेल्या अनेक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून वाळूचे दोन हायवा गायब

सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जप्त करून उभे करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता जप्त केलेले हे हायवा ट्रक परिसरातून गायब होते. मात्र, आत्तापर्यंत याविषयी कोणीही तक्रार दिली नाही. काल तहसीलदार मनीषा मेने यांना निलंबित करण्यात आल्यानंतर वाळू माफियांशी साटेलोटे करणाऱ्या या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आणि जप्त केलेले दोन्ही हायवा ट्रक चोरीला गेल्याची तक्रार खुद्द शासकीय अधिकाऱ्याने तालुका जालना पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. त्यामुळे, गेल्या चार दिवसांपासून ही तक्रार का दिली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भोकरदन, जाफराबाद, अंबड, घनसावंगी हे चार तालुके वाळू माफियांसाठी सोन्याची खाण आहेत. शासकीय कर्मचारी त्यांच्या दिमतीला तयार असतात असे देखील अनेक वेळा निष्पन्न झाले आहे. त्यातूनच काल मनीषा मेने यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून शांतीराम गोरखनाथ खांडेभराड यांना जिल्हाधिकारी यांच्या गौण खनीज भरारी पथकामध्ये नियुक्त करण्यात आले होते.

सोमवार दिनांक २५ रोजी शहरात फिरत असताना पथकाने सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास दुखीनगर येथे क्र. (एम.एच २१. बी.एच. २१००) या वाहनाला पकडले. यावेळी वाहन चालक सुनील ठोंबरे यांनी हायवा ट्रकमधील वाळू रिकामी केली. त्यानंतर हायवा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयात आणून उभा केला. त्यानंतर कन्हैया नगर परिसरात वाहन क्र. (एम.एच.२१. बीएच. ०७०७) या हायवा ट्रकमध्ये चालक संतोष भानुदास दानवे याला देखील भरलेल्या वाळू विषयी विचारणा करण्यात आली. मात्र, त्याच्याजवळ वाळू वाहतुकीबाबत कुठलीही परवानगी आढळली नाही. त्यामुळे हे दोन्ही हायवा ट्रक सकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आणून उभे करण्यात आले होते.

त्यानंतर शांतीलाल खांडेभराड हे कार्यालयाच्या किल्ल्या आणण्यासाठी बाहेर गेले. साडेनऊ वाजता परता आल्यानंतर खांडेभराड यांना दोन्ही वाहने गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे सोमवार दिनांक २५ रोजी घडलेल्या या घटनेविषयी पोलीस ठाण्यात तक्रार का देण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. प्रत्येकी १५ लाख रुपये किमतीचे २ हायवा ट्रक आणि एका हायवा ट्रकमधील पाच ब्रास वाळू ज्याची किंमत १० हजार रुपये आहे, असा एकूण ३० लाख १० हजार रुपयांचा माल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून चोरीला गेल्याची तक्रार अव्वल कारकून शांतीराम खांडेभराड यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून आज दुपारी एक वाजता गुन्हा दाखल झाला आहे. आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे. त्यामुळे, मनीषा मेने यांच्या निलंबनानंतर वाळू माफियांची संगणमत केलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा- कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना

Intro:जालना जिल्ह्यातील वाळू तस्करी ही काही नवीन नाही ,यापूर्वी देखील भोकरदन च्या महिला तहसीलदार या वाळूच्या तस्करी प्रकरणी निलंबित झाल्या होत्या. काल अंबड च्या तहसीलदार मनीषा मेने यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तडकाफडकी निलंबित केले .त्यांच्या या निलंबनानंतर या प्रकरणात गुंतलेल्या अनेक धिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. आणि यातूनच सोमवार दिनांक 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन हायवा जप्त करून उभे केले होते, सकाळी सहा वाजता जप्त केलेले हे हायवा नऊ वाजता गायब झाले .मात्र आत्तापर्यंत याविषयी कोणीही तक्रार दिली नाही. काल तहसीलदार मनीषा मेने यांना निलंबित करण्यात आल्यानंतर वाळूमाफियांशी साटेलोटे करणाऱ्या या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे .आणि जप्त केलेले हे हायवा चोरीला गेल्याची तक्रार खुद्द शासकीय अधिकाऱ्याने तालुका जालना पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ही तक्रार का दिली नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Body:भोकरदन ,जाफराबाद ,अंबड, घनसावंगी, हे चार तालुके वाळू माफिया साठी सोन्याची खाण आहेत, शासकीय कर्मचारी त्यांच्या दिमतीला तयार असतात हे देखील अनेक वेळा निष्पन्न झाले आहे. त्यातूनच काल मनीषा मेने यांना निलंबित करण्यात आले आहे .जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून शांतीराम गोरखनाथ खांडेभराड, यांना जिल्हाधिकारी यांच्या गौणखनिज भरारी पथकामध्ये नियुक्त करण्यात आले होते. हे पथक वाहनचालकासह सोमवार दिनांक 25 रोजी जालना शहरात फिरत असताना सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास दुखी नगर येथे एम एच 21 -B H- 2100या वाहनाला पकडले असता वाहन चालक सुनील ठोंबरे यांनी हायवा मधील वाळू रिकामी केली ,त्या नंतर हायवा जिल्हाधिकारी कार्यालयात आणून उभा केला, त्यानंतर कन्हैया नगर परिसरात एम एच 21-BH-0707 या हायवामध्ये चालक संतोष भानुदास दानवे याला देखील भरलेल्या वाळू विषयी विचारणा केली असता कोणतीही परवानगी दाखवली नाही. त्यामुळे हे दोन्ही हायवा सकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आणून उभे केले. त्यानंतर शांतीलाल खांडेभराड हे कार्यालयाच्या किल्ल्या आणण्यासाठी बाहेर जाऊन आले. तोपर्यंत साडेनऊ वाजले होते. साडेनऊ वाजता मात्र ही दोन्ही वाहने गायब झाल्याचे खांडेभराड यांच्या लक्षात आले .त्यामुळे सोमवार दिनांक 25 रोजी घडलेल्या या घटनेविषयी पोलिसांमध्ये तक्रार का देण्यात आली नाही ?असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. प्रत्येकी पंधरा लाख रुपये किमतीचे दोन हायवा आणि आणि एका हायवा मधील पाच ब्रास वाळू जीची किंमत दहा हजार रुपये आहे असा एकूण तीस लाख दहा हजार रुपयांचा माल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून चोरीला गेल्याची तक्रार अव्वल कारकून शांतीराम खांडेभराड यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून आज दुपारी एक वाजता गुन्हा दाखल झाला आहे. आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा ही केला आहे. त्यामुळे मनीषा मेने यांच्यानंतर निलंबनानंतर वाळूमाफियांची संगणमत केलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.