जालना- भोकरदन तालुक्यातील पेरजापूर येथील 158 शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या यादीत लाभ मिळाला आहे. कर्ज माफ झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचा स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कर्जमुक्ती प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी मी स्वतः व तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तयार आहेत. शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय व लूट होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असा विश्वास स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराचे अध्यक्ष महेश पुरोहित यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, प्राथमिक स्वरुपात काही शेतकऱ्यांचा टोपी, रुमाल, हार, देऊन, पेढे व साखर वाटून सन्मान करण्यात आला.