जालना: ओमायक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. ओमायक्राॅन हा संसर्गजन्य असला तरी तो धोकादायक नाही असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सध्या राज्यात ओमायक्राॅनचे 54 रुग्ण असून प्रोटोकाॅलनुसार दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे. त्याचबरोबर राज्यात आठ कोटी नागरिकांंचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत महाराष्ट्रात शंभर टक्के लसीकरण होईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.