ETV Bharat / state

गौण खनिजाच्या रॉयल्टीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार; पल्लवी सावकारेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

author img

By

Published : Oct 1, 2020, 5:30 PM IST

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, चोपडा यासह अनेक तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या वतीने अनेक पाझर तलाव, साठवण बंधारे तसेच जलसिंचन प्रकल्पांची कामे झाली आहेत. या कामांसाठी संबंधित ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर मुरूम, दगड तसेच वाळूची उचल केली आहे. त्यासाठी शासकीय नियमानुसार रॉयल्टी भरलेली नाही. एकाच ठिकाणच्या रॉयल्टीच्या पावतीवर अनेक ठिकाणांहून गौण खनिजाची उचल केलेली आहे.

गौण खनिज रॉयल्टी भ्रष्टाचार न्यूज
गौण खनिज रॉयल्टी भ्रष्टाचार न्यूज

जळगाव - जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या माध्यमातून अनेक पाझर तलाव, साठवण बंधारे तसेच विविध जलसिंचन प्रकल्पांची कामे करण्यात आलेली आहेत. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचा वापर झाला आहे. गौण खनिजाच्या रॉयल्टीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी, त्यात दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली आहे. या विषयासंदर्भात सावकारे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, चोपडा यासह अनेक तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या वतीने अनेक पाझर तलाव, साठवण बंधारे तसेच जलसिंचन प्रकल्पांची कामे झाली आहेत. या कामांसाठी संबंधित ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर मुरूम, दगड तसेच वाळूची उचल केली आहे. पण त्यासाठी शासकीय नियमानुसार रॉयल्टी भरण्यात आलेली नाही. एकाच ठिकाणच्या रॉयल्टीच्या पावतीवर अनेक ठिकाणांहून गौण खनिजाची उचल केलेली आहे. या साऱ्या प्रकारात जिल्हा परिषदेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ठेकेदारांशी साटेलोटे आहे. सर्वांनी मिळून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा संशय आहे. या प्रकारासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. अनेक वेळा पाठपुरावा करून देखील या प्रकरणाची चौकशी होत नसल्याने त्यांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

हेही वाचा - कोरोना काळात अतिक्रमणांवर 31 ऑक्‍टोबरपर्यंत तातडीने कारवाई करू नये-मुंबई उच्च न्यायालय

सविस्तर पुरावेही केले सादर -

या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी माहितीच्या अधिकारात काही पुरावे मिळवले आहेत. त्यात रॉयल्टीच्या पावत्यांची बनवाबनवी उघड झाली आहे, असा दावा सावकारेंनी केला आहे. जिल्ह्यात कुठे कुठे अनियमितता झाली आहे, याचे सविस्तर पुरावे त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन सादर केले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले.

अनेक कामांची माहिती देण्यास टाळाटाळ-

पल्लवी सावकारे यांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील कामांची सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडून मागितली आहे. परंतु, त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मुखत्वेकरून, बड्या कामांची माहिती दिली जात नसल्याचे सावकारे यांनी सांगितले. या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार असल्याची शक्यता आहे, असे सावकारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - ... तर महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरेल - मंत्री उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.