ETV Bharat / state

जळगावच्या उच्चशिक्षित तरुणाची सहकाऱ्यांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या - mumbai police

कंपनीत सहकाऱ्यांच्या छळाला अनिकेत कंटाळला होता. त्याचा प्रामाणिकपणा आणि वाढत चाललेली प्रगती हे न बघवल्याने सहकाऱ्यांनी त्याचा छळ करायला सुरूवात केली. याबद्दल तो वडिलांशी बोलला पण होता. वडिलांच्या सकारात्मक प्रतिसादानंतरही अनिकेतने राजीनामा न देता, आत्महत्या केली.

अनिकेत पाटील
author img

By

Published : Jul 25, 2019, 8:06 PM IST

जळगाव - मुंबईतील कॉर्पोरेट कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या जळगावातील एका उच्चशिक्षित तरुणाने सहकाऱ्यांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना गेल्या महिन्यात २६ जूनला रात्री घडली होती. मात्र, घटनेनंतर २ आठवड्यांनी त्याच्या बॅगेत सापडलेल्या सुसाईड नोटवरून त्याने सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळास कंटाळून जीवनयात्रा संपवल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावच्या उच्चशिक्षित युवकाची सहकाऱ्यांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या

अनिकेत दिलीप पाटील (२५) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अनिकेतचे कुटुंब मूळचे पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत गावचे रहिवासी आहेत. त्याचे वडील दिलीप पाटील हे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी कंपनीत नोकरीला आहेत तर आई भारती या गृहिणी आहेत. अनिकेत हा पाटील दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता.

जळगावात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर अनिकेतने मुंबईतील 'व्हीजेआयटी'तून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर त्याने जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए (मार्केटिंग) केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला कॅम्पसमधून सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या जे. के. हेलन कर्टिस नावाच्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळाली होती. कंपनीत तो कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देत नव्हता. मिळालेली जबाबदारी वेळेत पूर्ण करत होता. या कारणामुळे त्याचे सहकारी आकाश वडेरा, दर्पण घोडके, झाकीर हुसेन, विकास अगरवाल, राजीव सोहनी, सचिन श्रीवास्तव हे त्याच्यावर जळत होते. ते नेहमी त्याला टाकून बोलणे, अश्लील टोमणे मारणे, क्षुल्लक कारणावरून अंगावर धावून जाणे, असा छळ करत होते. अशी माहिती सुसाईड नोटमधून मिळाली आहे. अनिकेतला त्रास असह्य झाल्याने २६ जूनच्या रात्री राहत्या खोलीत आत्महत्या केली.

कंपनीत सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाला अनिकेत कंटाळला होता. त्यामुळे तो कंपनी सोडायच्या मानसिकतेत होता. या विषयासंदर्भात त्याने आईला २४ जूनला रात्री भ्रमणध्वनीवरून कल्पना दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ जूनला सकाळी त्याचे वडिलांशी याच विषयावर बोलणे झाले होते. वडिलांनी त्याला ईमेलवरून राजीनामा देऊन घरी परत ये, अशी विनंती केली होती. मात्र, त्याने आपण ३० जूननंतर कंपनी सोडणार असल्याचे सांगितले होते. २६ जूनला रात्री तो कंपनीच्या लोकांसोबत जेवायला बाहेर गेला. जेवून आल्यावर त्याने साकी विहारमधील गॅलेक्सी सृष्टी सदनिकेतील आपल्या खोलीत आत्महत्या केली. २७ जूनला सकाळी ही घटना उजेडात आली. काही कालावधीनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याची बॅग उघडून पाहिली असता त्यात सुसाईड नोट सापडली. त्यानंतर ही सुसाईड नोट घेऊन अनिकेतच्या वडिलांनी पवई पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. आम्ही आमचा मुलगा गमावला आहे. असा प्रकार अन्य कोणाच्याही मुलासोबत घडू नये, म्हणून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी अनिकेतचे आई-वडील करत आहेत.

अनिकेत हा लहानपणापासून अतिशय सभ्य आणि हुशार मुलगा होता. धार्मिक गोष्टींची त्याला आवड होती. आई-वडिलांनी पुढच्या वर्षी त्याचे लग्न करायचे ठरवले होते. त्यांनी तयारी सुरू करत जळगावातील घराचे नुकतेच नव्याने बांधकाम देखील केले होते. अशी माहिती अनिकेतच्या आई वडीलांनी सांगितली. मुंबईच्या नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवीने देखील सहकारी डॉक्टरांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. आता पुन्हा जळगावातील युवकाने अशाच प्रकारे आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:जळगाव
मुंबईतील कॉर्पोरेट कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या जळगावातील एका उच्चशिक्षित युवकाने सहकाऱ्यांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गेल्या महिन्यात २६ जूनला रात्री घडली होती. मात्र, घटनेनंतर २ आठवड्यांनी त्याच्या बॅगेत सापडलेल्या सुसाईड नोटवरून त्याने सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळास कंटाळून जीवनयात्रा संपवल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:अनिकेत दिलीप पाटील (वय २५, रा. जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अनिकेतचे कुटुंब मूळचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत गावाचे रहिवासी आहेत. त्याचे वडील दिलीप पाटील हे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी कंपनीत नोकरीला आहेत. तर आई भारती या गृहिणी आहेत. अनिकेत हा पाटील दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. जळगावात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर अनिकेतने मुंबईतील 'व्हीजेआयटी'तून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर त्याने जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए (मार्केटिंग) केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला कॅम्पसमधून सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या जे. के. हेलन कर्टिस नावाच्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळाली होती. कंपनीत तो कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देत नव्हता. मिळालेली जबाबदारी वेळेत पूर्ण करत होता. याच कारणामुळे त्याचे सहकारी आकाश वडेरा, दर्पण घोडके, झाकीर हुसेन, विकास अगरवाल, राजीव सोहनी, सचिन श्रीवास्तव हे त्याच्यावर जळत होते. ते नेहमी त्याला टाकून बोलणे, अश्लील टोमणे मारणे, क्षुल्लक कारणावरून अंगावर धावून जाणे, असा छळ करत होते. हा छळ असह्य झाल्याने अनिकेतने 26 जून रात्री राहत्या खोलीत आत्महत्या केली.

कंपनीत सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाला अनिकेत कंटाळला होता. त्यामुळे तो कंपनी सोडायच्या मानसिकतेत होता. या विषयासंदर्भात त्याने आईला २४ जूनला रात्री भ्रमणध्वनीवरून कल्पना दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ जूनला सकाळी त्याचे वडिलांशी याच विषयावर बोलणे झाले होते. वडिलांनी त्याला ईमेलवरून राजीनामा देऊन घरी परत ये, अशी विनंती केली होती. मात्र, त्याने आपण ३० जूननंतर कंपनी सोडणार असल्याचे सांगितले होते. २६ जूनला रात्री तो कंपनीच्या लोकांसोबत जेवायला बाहेर गेला. जेवून आल्यावर त्याने साकीविहारमधील गॅलेक्सी सृष्टी सदनिकेतील आपल्या खोलीत आत्महत्या केली. २७ जूनला सकाळी ही घटना उजेडात आली. घटनेनंतर अनिकेतचे तेरावं आटोपलं. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याची बॅग उघडून पाहिली असता त्यात सुसाईड नोट मिळून आली. या नोटमध्ये सहकारी आकाश वडेरा, दर्पण घोडके, झाकीर हुसेन, विकास अगरवाल, राजीव सोहनी, सचिन श्रीवास्तव यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे अनिकेतने नमूद केले आहे. त्यानंतर ही सुसाईड नोट घेऊन अनिकेतच्या वडिलांनी पवई पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. आम्ही आमचा मुलगा गमावला आहे. असा प्रकार अन्य कोणाच्याही मुलासोबत घडू नये, म्हणून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी अनिकेतचे आई वडील करत आहेत.Conclusion:अनिकेत हा लहानपणापासून अतिशय सभ्य आणि हुशार मुलगा होता. धार्मिक गोष्टींची त्याला आवड होती. आई-वडिलांनी पुढच्या वर्षी त्याचे लग्न करायचे ठरवले होते. त्यांनी तयारी सुरू करत जळगावातील घराचे नुकतेच नव्याने बांधकाम देखील केले होते. पण त्यापूर्वीच अनिकेतने टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले. मुंबईच्या नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवीने देखील सहकारी डॉक्टरांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. आता पुन्हा जळगावातील युवकाने अशाच प्रकारे आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.