ETV Bharat / state

जळगाव : दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; विष पाजल्याने पीडितेचा मृत्यू - जळगाव सामूहिक अत्याचार

पारोळा शहरात दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या एका 20 वर्षांच्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आज (१० ऑक्टोबर) प्रकृती खालावल्याले तिला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला आहे.

jalgaon rape news
दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; विष पाजल्याने पीडितेचा मृत्यू
author img

By

Published : Nov 10, 2020, 3:47 PM IST

Updated : Nov 10, 2020, 5:20 PM IST

जळगाव - पारोळा शहरात दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या एका 20 वर्षांच्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली होती. आज (१० ऑक्टोबर) प्रकृती खालवल्याले तिला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात तीन आरोपींसह एका महिलेचा समावेश आहे.

या घटनेसंदर्भात पीडित तरुणीच्या मामाने पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तिघा नराधमांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप रुग्णालय प्रशासनाचा शवविच्छेदन अहवाल प्रलंबित असल्याने तो आल्यानंतरच अनेक बाबी उघड होतील.

दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; विष पाजल्याने पीडितेचा मृत्यू

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत अॅट्रॉसिटीचे कलम अंतर्भूत आहे. तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल प्रलंबित असल्याने सामूहिक अत्याचाराबाबतची संदिग्धता कायम आहे. मात्र, पीडितेच्या नातेवाइकांनी याप्रकरणात सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप केलाय.

औषधं घेण्यासाठी गेली...आणि रुग्णालयात सापडली

या घटनेतील पीडित तरुणी ही पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील रहिवासी होती. दिवाळी सणासाठी ती 3 नोव्हेंबर रोजी भावासह पारोळा येथे मामाच्या घरी आली होती. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तरुणी औषधे घेण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. तरुणीच्या नातेवाईकांनी रात्रभर शोधाशोध करूनही तिचा शोध लागला नाही. म्हणून तिच्या मामाने 8 नोव्हेंबर रोजी सकाळी पारोळा पोलीस ठाण्यात भाची हरवल्याची तक्रार दाखल केली. याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता तिच्या मामाला एका तरुणीला विषबाधा झाली असून, तिच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर मामाने रुग्णालयात जाऊन खात्री केल्यानंतर ती आपलीच भाची असल्याचे समजले. तरुणी बेशुद्धावस्थेत होती. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्याचा सल्ला दिला. यानंतर तिला तातडीने धुळ्यात हलवण्यात आले.

धुळ्यात अखेरचा श्वास

शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीने, आपले अपहरण करून तीन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याचे नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर एका महिलेच्या मदतीने बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे ती म्हणाली. पीडित तरुणीने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या गावातील तीन तरुणांची नावेही सांगितली. 9 नोव्हेंबर रोजी पीडितेची प्रकृती चिंताजनक झाली होती. तिचे बोलणे बंद झाले होते. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. तिने वैद्यकीय महाविद्यालयात अखेरचा श्वास घेतला.

अपहरण, अज्ञातस्थळ आणि अत्याचार

टोळी गावातील रहिवासी शिवानंद शालिक पवार, पप्पू अशोक पाटील आणि अशोक वालजी पाटील या तिघांनी पीडितेचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा संशय आहे. यातील शिवानंद पवार हा पीडितेला मैत्री करण्यासाठी मोबाइलवरून फोन करण्यासाठी त्रास देत असे. पीडितेने धुळे येथे उपचारासाठी नेत असताना नातेवाइकांना याबाबत माहिती दिली. 7 नोव्हेंबर रोजी संशयित आरोपींनी पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिचे पारोळा शहरातून अपहरण केले. त्यानंतर तिला एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अज्ञातस्थळी नेऊन रात्रभर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. अत्याचार होत असताना पीडितेने प्रतिकार केला असता तिघा नराधमांसह एका अनोळखी महिलेने पीडितेला शिवीगाळ करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत पीडितेच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या.

दलित संघटना आक्रमक

पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेची माहिती सर्वत्र पसरली. त्यानंतर दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी दलित संघटनांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय सदस्य पांडुरंग बाविस्कर, उत्तम मोरे, लक्ष्मण महाले, मंगेश मोरे आदींनी पारोळा येथे धाव घेऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच पारोळा पोलिसांची भेट घेऊन आरोपींवर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही, तोपर्यंत पीडितेवर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा पीडितेच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यामुळे पारोळा शहरात तणावाचे वातावरण आहे.

Last Updated : Nov 10, 2020, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.