ETV Bharat / state

Year Ender 2021 Jalgaon : 'या' महत्त्वाच्या घटनांनी चर्चेत राहिला जळगाव जिल्हा

author img

By

Published : Dec 30, 2021, 7:36 PM IST

Updated : Dec 31, 2021, 10:10 AM IST

जिल्ह्यातील मावळत्या वर्षातील महत्वाची घटना ( Year Ender 2021 Jalgaon ) म्हणजे जळगावच्या चोपडा तालुक्यात विमान कोसळून अपघात ( Jalgaon plane Accident ) झाला होता. तर यावल तालुक्यात पपईने भरलेल्या ट्रक वर बसून प्रवास करत असलेल्या पंधरा मजुराचा एकाच वेळी अपघाती मृत्यू झाला होता. अशा अन्य घटनांनी जिल्ह्यातील समाजमन ढवळून निघाले.

Year Ender 2021 Jalgaon
Year Ender 2021 Jalgaon

जळगाव- 2021 या वर्षात अनेक घटना व घडामोडींनी जळगाव जिल्हा बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिला. मावळत्या वर्षात लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. जाणून घेऊ, अशा महत्त्वाच्या घटना.

  1. शेगावकडे जाण्यासाठी उड्डाण घेतले अन् 20 मिनिटांत आला विमान दुर्घटनेचा संदेश ( Jalgaon plane Accident )
    शिरपूरच्या विमानतळावरून कॅप्टन नुरूल अमीन अहमद बाशा (वय 28, रा. वेंकटेशपुरम, बंगळुरू) यांनी 16 जुलै रोजी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास शेगावला जाण्यासाठी उड्डाण केले अन् दुपारी 3.10 वाजता चोपडा तालुक्यातील वर्डी गावापासून 7 कि.मी. अंतरावर हे विमान कोसळले.

    जळगाव विमान दुर्घटना
    जळगाव विमान दुर्घटना
  2. मुबंईच्या एनसीपी पथकाने केला जळगावात 1500 किलो गांजा जप्त-
    जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ 14 नोव्हेंबर रोजी 1500 किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई मुंबई एनसीबीने केली. हा गांजा विशाखापट्टणम आणण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकारणानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यात येत आहे. विशाखापट्टनममधून येणारा हा गांजा कुठे जात होता? या संदर्भात सखोल चौकशी पथक करत असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
    1500 किलो गांजा जप्त
    1500 किलो गांजा जप्त
  3. जळगाव महापालिकेवर फडकला भगवा ( Shivsena won corporation election in Jalgaon )
    भाजपाचे 27 नगरसेवक फुटल्याने तसेच एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली आहेत. मनपाच्या महापौर व उपमहापौरपदासाठी 18 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा 15 मतांनी पराभव करत महापौरपदी आपले नाव निश्‍चित केले आहे. जयश्री महाजन यांना 45 मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मते मिळाली आहेत. भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने तसेच एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविला.
  4. एकनाथ खडसे व कन्या रोहीणी खडसेंकडून जिवाला धोका:शिवसेनेच्या आमदार चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट ( Clashes between Eknath Khadse and Chdrakant Patil )
    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप 25 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. मुक्ताईनगरात एका विषयावर वाद होऊन परस्परविरोधात गुन्हे दाखल आहेत. यावर रोहिणी खडसे खेवलकर यांनी महिलांवर जर अशाच पध्दतीने अन्याय होत राहिला तर वेळप्रसंगी आमदाराला चोप देवू अशी प्रतिक्रिया दिली.
    यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खडसे परिवाराकडून यापूर्वीही खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे तसेच हल्ले झाल्याचा प्रकार घडला आहे. रोहिणी खडसेंनी थेट चोप देण्याची भाषा केल्याने माझ्या जिवाला धोका आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.
    रोहीणी खडसे
    रोहीणी खडसे
  5. चक्क 65 वर्षांच्या आजीबाईने केला रॅम्पवॉक: खान्देश महोत्सव सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेचा समारोप
    खान्देश कस्तुरी मंचतर्फे आयोजित खान्देश महोत्सवात सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेत चक्क 65 वर्षांच्या आजीने सहभाग नोंदविला. तसेच तरुणी महिलांना लाजवेल असा रॅम्पवॉक करत आजीबाईने सर्वांचेच लक्ष वेधले. होते. ही स्पर्धे 25 व26 डिसेंबर रोजी झाली. खान्देशातील पारंपरिक वेशभूषेतील आजीबाईने रॅम्पवॉक करत सर्वांचे लक्ष तर वेधलेच मात्र स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला हे विशेष. भिकुबाई भगवान महाजन असे या आजीबाईचे नाव आहे. अहिराणी बोलीभाषेचा प्रचार प्रसारासाठी खान्देश कस्तुरी मंचतर्फे अमळनेरात दोन दिवसीय राज्यस्तरीय खान्देश महोत्सव पार पडला.
    खान्देश महोत्सव सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धा

  6. चाळीसगावात ढगफुटी: 15 गावांना पाण्याचा वेढा
    चाळीसगाव तालुक्यात 30 ऑगस्ट रोजी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस पडला होता. त्यामुळे गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. त्यामुळे गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. या पुराच्या पाण्यात चाळीसगाव तालुक्यातील सुमारे 15 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता.
    जिल्ह्यात मुसळधार पाऊस
    जिल्ह्यात मुसळधार पाऊस
  7. बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झवर न्यायालयात शरण ( Jalgaon BHR scam accused arrest )
    जळगाव येथील बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या घोटाळ्यातील मुख्य संशयित असलेला सुनील झंवर हा 5 मार्च रोजी पुण्याच्या विषेश न्यायालयात शरण आला आहे. शरण आल्यानंतर झंवर याने फरार घोषित होण्याचे वॉरंट याच घोटाळ्यातील दुसरा मुख्य संशयित तत्कालिन अवसायक (प्रशासक) जितेंद्र कंडारे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. बीएचआर सोसायटीतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. 27 नोव्हेंबरला जळगावात छापेमारी करुन सहा जणांना अटक केली. मुख्य संशयित सुनील झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे दोघे तेव्हापासून पोलिसांना हुलकावणी देत होते. पुण्याच्या न्यायालयाने झंवर व कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी 12 फेब्रुवारीला घोषणापत्र जारी केले होते. या घोषणापत्रानुसार 30 दिवसांच्या आत दोघांना न्यायालय किंवा पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढण्यात आले होते.
    बीएचआर पतसंस्था घोटाळा
    बीएचआर पतसंस्था घोटाळा
  8. जळगाव जिल्ह्यात महा विकास आघाडीची जादू भाजपला धक्का जिल्ह्यातील 783 पैकी 93 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर 15 जानेवारीला 687 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. यंदा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ ठरल्याचे चित्र असून, भाजपला हा जबर धक्का मानला जात आहे. काही तालुक्यात मात्र, भाजपने आपले वर्चस्व राखले. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या एकूण जागांमध्ये भाजप 181, शिवसेना 159, राष्ट्रवादी 174, काँग्रेस 14 तर स्थानिक आघाड्यांनी 159 ग्रामपंचायतींवर झेंडा रोवल्याचे प्राथमिक चित्र स्पष्ट होते. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित गावनेत्यांना पराभूत व्हावे लागले आहे. तर, अनेक नवे चेहरे ग्रामपंचायतीच्या कारभारात दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी दिग्गजांचे पॅनल पराभूत झाले. शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखल्याचे दावे केले आहेत.
    निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी
    निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी
  9. अंकलेश्वर - बऱ्हानपूर राज्यमार्गावर किनगाव ता. यावल गावाजवळ पपई भरून येत असलेल्या आईसर वाहनाचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात 15 जण जागीच ठार झाले. तर चार जण जखमी असून हा अपघात 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर घडला.
  10. चार भावंडांच्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
    रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार भावंडांच्या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेनंतर पोलीस तपासबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. बोरखेडा येथील एका शेतातील झोपडीवजा घरात 15 ऑक्टोबरला रात्री हे हत्याकांड घडले. त्यानंतर 16 ऑक्टोबरला सकाळी ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. चौघांनी दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे. हे चारही संशयित आरोपी हे हत्या झालेल्या भावंडांच्या मोठ्या भावाचे मित्र आहेत.

Last Updated : Dec 31, 2021, 10:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.