ETV Bharat / state

Women Murder in Bhusawal : भुसावळात विवाहित महिलेचा मृतदेह आढळला; खून झाल्याचा पोलिसांचा सशय - bhusawal city police latest news

भुस‍ावळ शहरातील वर्दळीच्या आरपीडी रस्त्यावरील पोलीस चौकी क्रमांक सातच्या मागे असलेल्या निर्जन जागी ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.

Women Deadbody found in Bhusawal
भुसावळात विवाहित महिलेचा मृतदेह आढळला
author img

By

Published : Dec 29, 2021, 10:47 PM IST

Updated : Dec 29, 2021, 11:00 PM IST

जळगाव - भुस‍ावळ शहरातील आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलीस चौकीमागील जंगलात महिलेचा मृतदेह आढळला आहे. ( Women Dead body found in Bhusawal ) सुचिता शुभम बारसे (32, रा.कवाडे नगर, भुसावळ) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेच्या छातीवर चाकूचे अनेक वार करून तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ( Women Murder in Bhusawal )

घटना काय?

वर्दळीच्या आरपीडी रस्त्यावरील पोलीस चौकी क्रमांक सातच्या मागे असलेल्या निर्जन जागी ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा खून झाल्याची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहायक निरीक्षक संदीप दुनगहू, विनोदकुमार गोसावी, बाजारपेठचे सहायक निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भुसावळ ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर चौधरी यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. महिला घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या परिसरातील नागरिकांना सहज तिची ओळख पडल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा - Khadse on Attack : हल्ल्याच्या मागे त्याच गुंड प्रवृत्तीचा हात - एकनाथ खडसे

शहरात खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. मद्यपी पतीचा महिलेने खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा शहरातील 32 वर्षीय विवाहितेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Last Updated : Dec 29, 2021, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.