ETV Bharat / state

फडणवीस..! तुम्ही तेव्हाच का माझ्याविषयी भूमिका स्पष्ट केली नाही; खडसेंचा थेट सवाल

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर, त्या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर झालेले सारे आरोप फेटाळले होते. खडसे या साऱ्या प्रकरणात खोटं बोलत असून, ते केवळ एकच बाजू मांडत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. यावर खडसेंनी आज मुक्ताईनगरात त्यांच्या फार्महाऊसवर फडणवीसांना थेट सवाल केला. यावेळी खडसेंनी अनेक मुद्दे मांडले.

ekantah khadse ask fadnavis
एकनाथ खडसे प्रेस
author img

By

Published : Oct 22, 2020, 12:06 PM IST

Updated : Oct 22, 2020, 12:14 PM IST

जळगाव - माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी आमचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांशी संपर्क केला. न्यायाची विनंती केली. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनाही भेटलो. पण फडणवीसांच्या हाती राज्याची सूत्रे असल्याने त्यांनी माझ्याबाबतीत चुकीची माहिती वरिष्ठांकडे सादर केली होती. त्यामुळेच मला न्याय मिळू शकला नाही. फडणवीस आता म्हणत आहेत की, या प्रकरणात मी एकच बाजू मांडली. उर्वरित बाजू ते वेळ आल्यानंतर सर्वांसमोर आणणार आहेत. पण मग गेली साडेचार वर्षे ते कुठे गेले होते. मी सातत्याने न्यायाची मागणी करत असताना, माझा गुन्हा काय, ते विचारत असताना त्यांनी चालढकल का केली? मला बेदखल का ठेवण्यात आले. जनतेसमोर माझी बाजू का आणली नाही, असा थेट सवाल एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना केला आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर, त्या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर झालेले सारे आरोप फेटाळले होते. खडसे या साऱ्या प्रकरणात खोटं बोलत असून, ते केवळ एकच बाजू मांडत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. यावर खडसेंनी आज मुक्ताईनगरात त्यांच्या फार्महाऊसवर फडणवीसांना थेट सवाल केला. यावेळी खडसेंनी अनेक मुद्दे मांडले.

एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

म्हणून मी राष्ट्रवादीची निवड केली?

खडसे पुढे म्हणाले की, मला न्याय मिळत नसल्यानेच मी माझ्या समर्थकांशी चर्चा करून अखेर पक्षांतर करण्याचा हा निर्णय घेतला आहे. माझ्यासोबत 15 ते 16 माजी आमदार आहेत. ते उद्या मुंबईत येणार आहेत. काही आजी आमदारही माझ्यासोबत आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना पक्ष सोडण्यास अडचण आहे. एवढ्या आमदारांनी राजीनामे दिले तर निवडणूक घेणे शक्य नाही. राष्ट्रवादीला आमच्या भागात नेतृत्त्व नाही, म्हणून मी राष्ट्रवादीची निवड केली. नेतृत्त्व म्हणून आपल्याला राजकारणात सक्रिय राहता येईल, हा हेतू असल्याने मी राष्ट्रवादीची निवड केली. नाही तर मला शिवसेना, काँग्रेसकडूनही ऑफर होतीच.

पक्षाचे आदेश मी 40 वर्षे पाळले. त्यानुसार मी आजपर्यंत काम करत आलो. आपल्याबाबतीत पक्षाने घेतलेला सामूहिक निर्णय असेल म्हणून मी न्यायाची अपेक्षा करत होतो. एकेक विषयावर मी फडणवीस यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करत होतो. माझ्याबाबतीत जे काही घडले ते जनतेला माहिती आहे. विधानसभेच्या काळात जे घडले तेव्हा जर मला विश्वासात घेतले असते तर चित्र कदाचित वेगळे राहिले असते, असेही ते म्हणाले.

साडेचार वर्षे विविध आरोपांना सामोरे गेलो-

गेली साडेचार वर्षे मी वेगवेगळ्या आरोपांना सामोरे जात होतो. तेव्हा मी पक्षाकडून न्यायाच्या अपेक्षेत होतो. पण माझी पक्षाकडून दखल घेतली गेली नाही. माझ्या बाबतीत गांभीर्याने लक्ष दिले नाही. खोट्या केसेस माझ्यावर फडणवीसांनी दाखल करायला लावल्या. त्यात मी एकटा लढून बाहेर पडलो. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याबाबतीत वरिष्ठ लोकांकडे चुकीची माहिती सादर केली. त्यात मला न्याय मिळणार नाही, अशी खात्री झाल्यानंतर मी पक्ष सोडण्याचे ठरवले. शेवटपर्यंत पक्षाकडून कुणीही संपर्क केला नाही. चंद्रकांत पाटील हे एकमेव नेते होते, ज्यांनी मला जाऊ नका म्हणून आवाहन केले. माझं आजही स्पष्ट मत आहे, देवेंद्र फडणवीसांमुळेच भाजपचे सरकार येऊ शकले नाही. याआधी आम्ही प्रतिकूल परिस्थिती असताना सरकार आणले होते. पण फडणवीसांनी ५ वर्षे सरकार असताना केलेले काम, युती होती, अशा सर्व गोष्टी उपलब्ध असताना त्यांना सरकार का आणता आले नाही? असा माझा प्रश्न आहे.

माझ्यासह चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता हे नेते सातत्याने निवडून येणारे होते. यांची तिकिटे का कापली? याचेही उत्तर फडणवीसांनी का दिले नाही. फडणवीसांनी माझ्यावर खोट्या केसेस करायला मदत केली. विनयभंग सारखा खटला माझ्यावर दाखल झाला. म्हणून आज हे जर विनयभंग सारखा खटला माझ्यावर दाखल करू शकतात तर उद्या काहीही अघटित घडू शकते. अशी माझी धारणा झाल्यानेच मी केवळ आणि केवळ फडणवीसांमुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांना काढला चिमटा-

देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्त्व खरंच सक्षम आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे आमची सत्ता गेली, त्यांच्या नेतृत्त्वाला तोड नाही. 'मी पुन्हा येणार...मी पुन्हा येणार...' हा त्यांचा अहंकार पक्षाला पर्यायाने सर्वांना नडला आहे. पक्षाला मोठं करण्यात आमचे थोडं का होईना आमचे योगदान आहेच ना? मग आम्हाला का बाजूला सारण्यात आला. 40 वर्षे आम्ही पक्षाला दिली. तरीही अशा पद्धतीने पक्ष सोडावा लागत असेल तर मग तुम्ही चिंतन करणार आहात की नाही? असा सवालही त्यांनी पक्षाला यावेळी केला.

कुठल्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीत गेलेलो नाही-

मी कुठल्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीत गेलेलो नाही. मला माझ्या अनुभवानुसार जी जबाबदारी सोपवली जाईल, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, रक्षा खडसे भाजपतच राहणार असल्याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आजवर अनेक उदाहरणे आहेत की एकच घरातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात कार्यरत आहेत. मी भाजप सोडली तरी रक्षा खडसे या भाजपत राहणार आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने बदलणार उत्तर महाराष्ट्राचे राजकारण

Last Updated : Oct 22, 2020, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.