ETV Bharat / state

'देवेंद्र फडणवीस यांनी भीष्मप्रतिज्ञा मोडून लग्न केले'

देवेंद्र फडणवीस हे 5 वर्षे मुख्यमंत्री होते. दिल्लीतही भाजपचे सरकार आहे. मग 5 वर्षांच्या कालखंडात फडणवीस यांनी केंद्राकडून डाटा उपलब्ध करत ओबीसींना आरक्षण का दिले नाही? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला. ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Jun 28, 2021, 9:31 PM IST

जळगाव - ओबीसी आरक्षणासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारने जनगणनेचा डाटा उपलब्ध करून दिला, तर राज्य सरकार त्यावर काम करू शकणार आहे. पण, एकीकडे केंद्राकडून हा डाटा मिळू द्यायचा नाही आणि दुसरीकडे आम्ही ओबीसींचे पाठीराखे आहोत असे म्हणायचे, ही दुटप्पी भूमिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसे सोमवारी दुपारी जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आलेले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच टीकास्त्र सोडले. वेगळा विदर्भ, राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेला शपथविधी अशा विषयांना घेत खडसे यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

'त्यावेळी ओबीसींना आरक्षण का दिले नाही?'

ओबीसी आरक्षण हा काही आजचा विषय नाही. 2011 मध्ये त्यासंदर्भात प्रयत्न झाले होते. तेव्हा जनगणना झाली होती. त्याचा डाटा केंद्र सरकारकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2 वेळा हा डाटा उपलब्ध व्हावा म्हणून पंतप्रधानांना पत्र लिहिले. पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांनीही याबाबत पत्र लिहिले आहेत. परंतु, केंद्र सरकारने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. देवेंद्र फडणवीस हे 5 वर्षे मुख्यमंत्री होते. दिल्लीतही भाजपचे सरकार आहे. मग 5 वर्षांच्या कालखंडात फडणवीस यांनी केंद्राकडून डाटा आणून ओबीसींना आरक्षण का दिले नाही? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.

'देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पी'

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. ती फसवणूकच होती. कारण जोपर्यंत जनगणनेचा डाटा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अध्यादेशाला अर्थ नाही, हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती होते. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारने जनगणनेचा डाटा उपलब्ध करून दिला, तर राज्य सरकार काम करू शकणार आहे. पण हा डाटा मिळू द्यायचा नाही आणि आम्ही ओबीसींचे पाठीराखे आहोत, असे म्हणायचे ही भूमिका दुटप्पी आहे. आता राज्य सरकारने या कामासाठी मागासवर्गीय आयोग नेमला आहे. त्यामुळे ओबीसींची जनगणना होईल, असेही खडसेंनी सांगितले.

'फडणवीसांनी भीष्मप्रतिज्ञा मोडून लग्न केले'

आपल्या हाती सत्ता दिली तर ओबीसींना 3 महिन्यांत आरक्षण देऊ, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या चक्काजाम आंदोलनावेळी जाहीर केली होती. याबाबत खडसे म्हणाले, फडणवीस वारंवार अशी वक्तव्ये करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखे नाही. फडणवीस यांनी यापूर्वी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनावेळीही, वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नाहीत, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी ही भीष्मप्रतिज्ञा मोडून लग्न केले. त्यांना मुलगी पण झाली. असा प्रकार आपण पुराणात पाहिला आहे. विश्वामित्राने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केले होते. त्यांना मुलगीही झाली होती. फडणवीस यांनी यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असे ठणकावून सांगितले होते. पण, पहाटे त्याच राष्ट्रवादी काँग्रेससोबत शपथ घेतली, असा चिमटाही खडसेंनी यावेळी काढला. दरम्यान, माझी फडणवीस यांना विनंती आहे की, त्यांनी संन्यास घेऊ नये. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत. पाच वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम करत रहावे. तसेच, सरकारला अशाच वेगवेळ्या सूचना करत रहाव्यात, असा सल्लाही खडसेंनी यावेळी फडणवीसांना दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.