ETV Bharat / state

'तौक्ते'च्या धर्तीवर नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देऊ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन - जळगाव शहर बातमी

मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील सुमारे 3 हजार हेक्टरवरील केळीच्या बागा तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तौक्ते वादळानंतर ज्याप्रमाणे कोकणला राज्य सरकारने जाहीर मदत केली. त्याच धर्तीवर या दोन्ही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना तातडीने मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन आज (दि. 29 मे) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

पाहणी करताना
पाहणी करताना
author img

By

Published : May 29, 2021, 8:52 PM IST

Updated : May 29, 2021, 9:24 PM IST

जळगाव - मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील सुमारे 3 हजार हेक्टरवरील केळीच्या बागा तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तौक्ते वादळानंतर ज्याप्रमाणे कोकणला राज्य सरकारने जाहीर मदत केली. त्याच धर्तीवर या दोन्ही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना तातडीने मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन आज (दि. 29 मे) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

बोलताना मंत्री पाटील

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी दुपारनंतर रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी बसला वादळाचा फटका

जळगाव जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी जोरदार मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. त्यात तापी व पूर्णा पट्ट्यातील केळी बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. तसेच अनेक गावातील घरांची पडझड होऊन संसार उघड्यावर आले. विजेचे पोल जमिनीवर कोसळले. डेरेदार वृक्ष उन्मळून पडले. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन्ही तालुक्यांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढाळदे, उचंदा, शेमळदे तसेच रावेर तालुक्यातील विटवा, निंबोल, ऐनपूर गावातील नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत तातडीने मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नुकसानग्रस्त भागांचे सरसकट पंचनामे करा

या दौऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्याचा अहवाल तातडीने जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यावर्षी काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, तर काहींनी पीक विम्याचे निकष बदलल्याने विमा काढलेला नाही. मात्र, चक्रीवादळात सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

तीन दिवसात वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश

चक्रीवादळामुळे दोन्ही तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये विजेचे पोल, रोहित्र यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घ्यावे. आगामी तीन दिवसात या परिसरातील वीज पुरवठा सुरू करावा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी

या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. गेल्या वर्षी पीक विमा काढला होता. अतिवृष्टी, अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले. पण, पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. आता यावर्षी पीक विमा काढलेला नाही. मात्र, मान्सूनपूर्व वादळी पावसाने केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता तरी शासन मदत देईल का, असा सवाल शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना विचारला. नुसते पाहणी दौरे करू नका. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्या, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा - रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात 2 हजार हेक्टरवरील केळीचे नुकसान; 700 घरांची पडझड

Last Updated : May 29, 2021, 9:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.