जळगाव - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव महापालिका क्षेत्रात येत्या सोमवारपासून (20 जुलै) 'जनता कर्फ्यू' लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यात एका आठवड्यात प्रत्येक दिवशी तीन प्रभागांमध्ये हा जनता कर्फ्यू असणार आहे. जनता कर्फ्यू नागरिकांनी स्वतः पाळायचा आहे. कर्फ्यू जाहीर करण्यात आलेल्या प्रभागात केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात जळगाव महापालिका क्षेत्रासह भुसावळ व अमळनेरात लोकल लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता येत्या सोमवारपासून शहरातील विविध ठिकाणची व्यापारी संकुले सुरू होणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रशासनाने नियमावली तयार केली आहे.
20 पेक्षा अधिक दुकाने असलेल्या व्यापारी संकुलातील दुकानदारांना दुपारी 12 ते सायंकाळी 4 यावेळेत मालाची केवळ घरपोच डिलिव्हरी देता येणार आहे. नागरिकांना अशा व्यापारी संकुलात माल खरेदीसाठी जाता येणार नाही. 20 पेक्षा कमी दुकाने असलेल्या व्यापारी संकुलात मात्र सर्व दुकाने सम-विषम नियमानुसार उघडतील. येथील दुकानदारांना सकाळी 9 ते सायंकाळी 7 यावेळेत दुकाने सुरू ठेऊन काउंटरवरून मालाची विक्री करता येणार आहे. पण दुकानात एकाच वेळी 5 पेक्षा अधिक ग्राहक एकत्र येणार नाहीत, हँड सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. शहरातील गर्दी कमी व्हावी, जेणे करून कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता महापालिका प्रशासन घेत आहे. यामुळेच जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
जनता कर्फ्यूचे नियोजन-
सोमवार (20 जुलै) : प्रभाग 1, 2, 3
शिवाजीनगर, राधाकृष्ण नगर, महावीर नगर, इंद्रप्रस्थ नगर, गेंदालाल मिल, वाल्मीकनगर असोदा रोड, कांचननगर, सदाशिव नगर आदी परिसर.
मंगळवार (21 जुलै) : प्रभाग 4, 5, 6
शनिपेठ, रिधूरवाडा, जोशीपेठ, ओंकारनगर, जयसिकनवाडी, तायडे गल्ली, विसनजी नगर, अजिंठा चौफुली, जिल्हापेठ, ओंकारनगर, नशिराबाद रोड, कालिकामाता मंदिर परिसर नगर
बुधवार (22 जुलै) : प्रभाग 7, 8, 9
यशवंत कॉलनी, रिंगरोड, शिक्षकवाडी, एलआयसी कॉलनी, शिवकॉलनी, जिवरामनगर, भोईटेनगर, दादावाडी, शंकरअप्पा नगर, हायवेदर्शन कॉलनी, पिंप्राळा
गुरुवार (23 जुलै) : प्रभाग 10, 12, 12
दांडेकरनगर, पिंप्राळा, ख्वाजानगर, हुडको, हरिविठ्ठलनगर, बाजारपट्टा, कोल्हेनगर, महाबळ परिसर, मकरंद कॉलनी, पार्वतीनगर, रामानंद नगर, प्रभाग कॉलनी, जयनगर
शुक्रवार (24 जुलै) : प्रभाग 13, 14, 15
मोहनगर, आदर्शनगर, नेहरू नगर, मोहाडी रोड, लक्ष्मीनगर मेहरूण, आदर्श नगर, मोहमद्दियानगर, जोशी वाडा, ज्ञानेश्वर चौक
शनिवार (25 जुलै) : प्रभाग 16, 17
सिंधी कॉलनी, ईश्वर कॉलनी, गणेश नगर, अशोक नगर, औदोगीक नगर
रविवार (26 जुलै) : प्रभाग 18, 19
अक्सानगर, गणेशपुरी, रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी आदी परिसर