जळगाव : शाळेत दर शनिवारी दफ्तरमुक्त शाळा हा उपक्रम राबविण्यात येतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रार्थना झाल्यावर अभ्यासक्रमातील कविता, ओव्या म्हणून कवायत आणि व्यायाम करून घेतला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा त्यांच्यात नेतृत्व गुण निर्माण व्हावे म्हणून विविध विषयांवर त्यांना भाषण करायला सांगितले जाते. सामूहिक वृत्तपत्रे वाचन तसेच इंग्रजी भाषेची भीती कमी व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले जाते. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी अशी माहिती दिली.
दप्तरमुक्त शाळा : सध्या सर्व पालकांना आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिक्षण घ्यावे असे वाटत असते. त्यामुळे मराठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही कमी होत चालली आहे. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी जळगाव जिल्ह्यातील पिलखेडे गावातील शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले. दप्तरमुक्त शाळा हा अनोखा उपक्रम या शाळेत राबविला जातो. त्याचमुळे या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती 100 टक्केवर पोहोचली आहे. याच माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास ही वाढला आहे. यामुळेच इतर खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनीही या शाळेत प्रवेश घेतला आहे.
विविध विषयांवर भाषण : या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत दर शनिवारी दफ्तरमुक्त शाळा हा उपक्रम राबविण्यात येतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रार्थना झाल्यावर अभ्यासक्रमातील कविता, ओव्या म्हणून कवायत आणि व्यायाम करवून घेतला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा त्यांच्यात नेतृत्व गुण निर्माण व्हावे म्ह्णून विविध विषयांवर त्यांना भाषण करायला सांगितले जाते. या संदर्भातील माहिती शाळेचे उपक्रमशील शिक्षक किशोर सोनवणे यांनी दिली. शाळेतील विद्यार्थी दोन ते तीन दिवस शाळेत आला नाही की, त्याच्या घरी जाऊन शिक्षक विचारपूस करतात. तर आजारी विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करून योग्य तो सल्ला दिला जातो.
मी बोलणार, मी वाचणार उपक्रम : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्यात नेतृत्व गुण निर्माण व्हावे तसेच त्यांना संस्कृती समजावी यासाठी विविध विषयांवर त्यांना भाषण करायला सांगितले जाते. सामूहिक वृत्तपत्राचे वाचन, तसेच इंग्रजी भाषेची भीती कमी व्हावी यासाठी मी बोलणार, मी वाचणार असा उपक्रमही शिक्षणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. रोज शाळेत येताना आनंद वाटतो तसेच आमचा आत्मविश्वासही वाढला असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
शिक्षणाचा हा प्रयोग यशस्वी : पिलखेडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मिळणारे आनंददायी शिक्षण पाहून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतले आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची १०० टक्के हजेरी राहू लागली आहे. १८०० लोकसंख्येच्या छोट्या गावातील आनंददायी शिक्षणाचा हा प्रयोग यशस्वी ठरत आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण विभागानेही प्रयत्न केले. यामुळे या शाळेत आम्हाला शिकण्यासाठी एक वेगळेच आनंद मिळतो अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
इतर शाळेत असे प्रयत्न करावेत : जळगाव जिल्ह्यातल्या पिलखेळा शाळेतील शिक्षकांचा हा अनोखा उपक्रम अनुकरणीय ठरणार आहे. असेच विविध उपक्रम राबवून इतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे. जेणेकरून अमाप पैसा भरून विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत टाकण्यापासून पालकांचा कल जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळेल. असे मत शिक्षकांने व्यक्त केले.
हेही वाचा : Ishaans unique skills दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधून तो करतो कोणतेही काम