ETV Bharat / state

जळगावात अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले; विधी अधिकाऱ्याचा मृत्यू - जळगाव अपघात बातमी

जळगाव तालुक्याती बांभोरी जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात विधी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

unidentified-vehicle-hit-a-two-wheeler-in-jalgaon
जळगावात अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले; विधी अधिकाऱ्याचा मृत्यू
author img

By

Published : Jan 20, 2021, 6:36 PM IST

जळगाव - धरणगाव तालुक्यातील बांभोरी जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत विधी अधिकारी जागीच ठार झाले असून पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पारोळा येथे कामानिमित्त जात असतांना हा अपघात घडला.

जखमी रूग्णालयात दाखल -

याबाबत वृत्त असे की, जिल्हा पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे दुर्गादासगिरी गोसावी आणि शनिपेठ पोलीस स्थानकात कार्यरत संदीप भीकन पाटील हे सकाळी दुचाकीने जळगावहून पारोळ्याकडे कामानिमित्त जात होते. बांभोरी जवळ त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुर्गादासगिरी गोसावी ( रा. पाचोरा) हे जागीच ठार झाले असून संदीप भीकन पाटील ( रा. पोलीस वसाहत, जळगाव) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहन चालकाचे घटनास्थळाहून पलायन -

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दुर्गादासगिरी गोसावी यांना जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. या अपघातामुळे पोलीस दलावर शोक लहर पसरली आहे. या दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांच्या दुचाकीला धडक देणार्‍या वाहन चालकाने घटनास्थळाहून वाहनासह पलायन केले असून आता त्याचा शोध घेतला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.