ETV Bharat / state

भुसावळात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार; महामार्गावर अपघातांचे सत्र कायम

author img

By

Published : Jun 21, 2021, 9:45 AM IST

भुसावळमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातातील मृत तरुण रेल्वेत गँगमन म्हणून नोकरीला होते.

Two youths were killed when an unidentified vehicle hit them in Bhusawal
भुसावळात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार; महामार्गावर अपघातांचे सत्र कायम

जळगाव - जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना, रविवारी रात्री उशिरा भुसावळात राष्ट्रीय महामार्गावरील माळी भवनाजवळील उड्डाणपुलावर घडली. अल्ताफउद्दीन बशिरोद्दीन शेख (वय 24) व शेख शरीफ शेख इद्रीस (वय 25) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे भुसावळ शहरातील ग्रीन पार्क भागातील रहिवासी होते.

दोघांचा घटनास्थळी मृत्यू -

अल्ताफउद्दीन व शरीफ हे दोघे मित्र रविवारी रात्री खडका रोड चौफुलीकडून राष्ट्रीय महामार्गावरून नाहाटा चौफुलीच्या दिशेने जात होते. याच दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला.

महामार्गावर वाहतूक ठप्प -

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला, अनिल मोरे, रवींद्र बिर्‍हाडे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

अपघातांचे सत्र थांबेना; 4 दिवसांपूर्वीही दोन भावंडांचा झाला होता मृत्यू -

महामार्गावर अपघातांचे सत्र कायम असून, चार दिवसांपूर्वीच भुसावळातील सिंधी कॉलनीतील दोन भावंडाचा साकेगावजवळ अपघाती मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा रविवारी अपघात होऊन दोन तरुण ठार झाले. या घटनेमुळे ग्रीन पार्क भागात शोककळा पसरली. अपघातातील मृत तरुण रेल्वेत गँगमन म्हणून नोकरीला होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.