ETV Bharat / state

जळगावमध्ये तापी नदीत बुडून दोघांचा मृत्यू - मृत्यू

केटरिंगच्या कामासाठी शनिवारी प्रेम व जयेश हे अन्य 2 मित्रांसोबत भुसावळमध्ये गेले होते. काम आटोपून सायंकाळी पाडळसे गावाकडे परत येत असताना त्यांना पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे तापी पात्रातील लहान पुलाजवळ 4 जण गेले.

जळगावमध्ये तापी नदीत बुडून दोघांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 14, 2019, 1:26 AM IST

जळगाव - भुसावळ येथील तापी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रेम चंद्रशेखर चौधरी (वय २०) आणि जयेश नारायण झोपे (वय १९, दोघेही रा. यावल ता. पाडळसे), अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

जळगावमध्ये तापी नदीत बुडून दोघांचा मृत्यू

केटरिंगच्या कामासाठी शनिवारी प्रेम व जयेश हे अन्य 2 मित्रांसोबत भुसावळमध्ये गेले होते. काम आटोपून सायंकाळी पाडळसे गावाकडे परत येत असताना त्यांना पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे तापी पात्रातील लहान पुलाजवळ 4 जण गेले. प्रेम व जयेशने पाण्यात उड्या मारल्या. मात्र, उड्या मारल्यानंतर दोघे पाण्यावर आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या 2 मित्रांनी आरडाओरड केली. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. शहर पोलिसांना देखील घटनेची माहिती कळवण्यात आली. त्यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी अर्ध्या तासात दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पाडळसे गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाडळसे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:जळगाव
तापी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. प्रेम चंद्रशेखर चौधरी (वय २०) आणि जयेश नारायण झोपे (वय १९) अशी दोन्ही मृत युवकांची नावे असून ते यावल तालुक्यातील पाडळसे येथील रहिवासी आहेत.Body:केटरिंगच्या कामासाठी शनिवारी प्रेम व जयेश हे अन्य दोन मित्रांसोबत भुसावळात गेले होते. काम आटोपून सायंकाळी पाडळसे गावाकडे परत येत असताना त्यांना पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे तापी पात्रातील लहान पुलाजवळ चौघे मित्र गेले. प्रेम व जयेशने पाण्यात उड्या मारल्या. मात्र, उड्या मारल्यानंतर दोघे पाण्यावर आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी आरडाओरड केली. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. शहर पोलिसांना देखील घटनेची माहिती कळवण्यात आली. त्यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी अर्ध्या तासात दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.Conclusion:दरम्यान, या घटनेमुळे पाडळसे गावावर एकच शोककळा पसरली आहे. पोहण्याचा मोह आवरता न आल्याने प्रेम व जयेश यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेमुळे पाडळसे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.