ETV Bharat / state

जळगावात बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना अटक;  हजारांच्या बनावट नोटांसह साहित्य जप्त

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा जळगावातील औद्योगिक वसाहत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून शंभर रुपये मूल्य असलेल्या 74 हजार 300 रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

author img

By

Published : Aug 18, 2019, 2:14 AM IST

जळगावात बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव - बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा शहरातील औद्योगिक वसाहत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून शंभर रुपये मूल्य असलेल्या 74 हजार 300 रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

शहरातील तांबापूर परिसरात दोन तरुण कलर झेरॉक्स वापरून बनावट नोटा बनवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून तांबापूर परिसरातील एका घरावर छापा टाकला. शेख रईस शेख रशीद आणि अहमद खान अफजल खान या दोन तरुणांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून बनावट नोटांनी भरलेली पिशवी हस्तगत करण्यात आली आहे. यात शंभर रुपये मूल्य असलेल्या 74 हजार 300 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. यासाठी वापरण्यात येणार साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.

चलनात आणल्या शंभरच्या बनावट नोटा -

गेल्या काही दिवसांपासून या दोघांनी शंभरच्या बनावट नोटा चलनात आणलेल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपी येत्या काही काळात देखील या 74 हजार 300 रुपयांच्या नोटा चलनात आणणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. जिल्ह्यात आणखी कुठे या बनावट नोटा चलनात आणल्या आहेत का, यात मोठे रॅकेट आहे का, यासंदर्भात औद्योगिक वसाहत पोलीस तपास करत आहेत. दोन्ही आरोपींविरोधात औद्योगिक वसाहत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर बनावट नोटा चलनात आल्यामुळे नागरिक धास्तावलेले आहेत.

Intro:जळगाव
बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा जळगावातील औद्योगिक वसाहत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून शंभर रुपये मूल्य असलेल्या 74 हजार 300 रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.Body:शहरातील तांबापूर परिसरात दोन तरुण कलर झेरॉक्स वापरून बनावट नोटा बनवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून तांबापूर परिसरातील एका घरावर छापा टाकला. शेख रईस शेख रशीद आणि अहमद खान अफजल खान या दोन तरुणांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून बनावट नोटांनी भरलेली पिशवी हस्तगत करण्यात आली आहे. यात शंभर रुपये मूल्य असलेल्या 74 हजार 300 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. यासाठी वापरण्यात येणार साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.Conclusion:चलनात आणल्या शंभरच्या बनावट नोटा-

गेल्या काही दिवसांपासून या दोघांनी शंभरच्या बनावट नोटा चलनात आणलेल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपी येत्या काही काळात देखील या 74 हजार 300 रुपयांच्या नोटा चलनात आणणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. जिल्ह्यात आणखी कुठे या बनावट नोटा चलनात आणल्या आहेत का, यात मोठे रॅकेट आहे का, यासंदर्भात औद्योगिक वसाहत पोलीस तपास करत आहेत. दोन्ही आरोपींविरोधात औद्योगिक वसाहत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बनावट नोटा चलनात आल्यामुळे नागरिक धास्तावलेले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.