जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालानंतर (maharashtra gram panchayat result 2022) विजयी उमेदवारांनी गावात मिरवणूक काढत देवदर्शनासाठी जात होते. या दरम्यान गावातील दोन गट भिडून तुफान हाणामारी (fight between two groups) व दगडफेक (death of stone pelting youth) झाली. असून या घटनेत विजयी पॅनलमधील व सदस्य पदी विजयी झालेल्या उमेदवाराचे नातेवाईक धनराज श्रीराम माळी हे गंभीर जखमी झाले. (fight after election result) गंभीर तरुणाला तातडीने अवस्थेत त्यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेमुळे टाकळी गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांचा बंदोबस्त तैनात : या घटनेमुळे जामनेर उपजिल्हा रुग्णालयात देखील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी व मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली. रुग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पराभूत झालेल्या पॅनलच्या गटाकडून दगडफेक व हाणामारी झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेनंतर टाकळी गावात तणावपूर्ण शांतता असून गावात कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीला गाल बोट लागले असून याप्रकरणी अद्याप तरी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.