ETV Bharat / state

विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने ट्रकला आग; रेडिमेड कपड्यांसह ट्रक जळून खाक - रेडिमेड कपड्यांसह ट्रक खाक

ट्रक रेडिमेड कपड्यांचा माल घेवून जळगावला येत होता. रस्त्यात नशिराबाद गावाजवळ ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग लागली. ट्रकमध्ये कपड्यांचा माल असल्याने क्षणात आग भडकली.

विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने ट्रकला आग
author img

By

Published : May 28, 2019, 9:50 AM IST

जळगाव - अमरावती येथून रेडिमेड कपड्यांचा माल घेऊन जळगावला येत असलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग लागली. या घटनेत कपड्यांचा माल तसेच ट्रक जळून खाक झाला आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने ट्रकला आग; रेडिमेड कपड्यांसह ट्रक खाक झाल्याने लाखोंचे नुकसान

अमरावती येथील सागर रोडवेज ट्रान्सपोर्ट कंपनीचा (एमएच 19 एक्‍स 632) ट्रक रेडिमेड कपड्यांचा माल घेवून जळगावला येत होता. रस्त्यात नशिराबाद गावाजवळ ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग लागली. ट्रकमध्ये कपड्यांचा माल असल्याने क्षणात आग भडकली. दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांनी ट्रकला आग लागल्याचे चालकाला सांगितले. तेव्हा चालकाने ट्रक थांबवून क्लिनरसह उड्या मारल्या. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले होते. परंतु, तोपर्यंत ट्रक आणि माल जळून खाक झाला होता.

महामार्गावरून खाली उतरवला ट्रक-

ट्रकला आग लागल्याने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक वेळीच महामार्गाच्या खाली उतरवला. मात्र, यावेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत उलटला.

Intro:जळगाव
अमरावती येथून रेडिमेड कपड्यांचा माल घेऊन जळगावला येत असलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग लागली. या घटनेत कपड्यांचा माल तसेच ट्रक जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.Body:अमरावती येथील सागर रोडवेज ट्रान्सपोर्ट कंपनीचा (एमएच 19 एक्‍स 632) क्रमांकाचा ट्रक रेडिमेड कपड्यांचा माल घेवून जळगावला येत होता. रस्त्यात नशिराबाद गावाजवळ ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग लागली. ट्रकमध्ये कपड्यांचा माल असल्याने क्षणात आग भडकली. दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांनी ट्रकला आग लागल्याचे चालकाला सांगितले. तेव्हा ट्रक चालकाने ट्रक थांबवून क्लिनरसह उड्या मारल्या. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या बंबाना पाचारण करण्यात आले होते. परंतु, तोवर ट्रक आणि माल जळून खाक झाला होता.Conclusion:महामार्गावरून खाली उतरवला ट्रक-

ट्रकला आग लागल्याने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक वेळीच महामार्गाच्या खाली उतरवला. मात्र, यावेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत उलटला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.