ETV Bharat / state

गावाच्या विकासासाठी 'तृतीयपंथी' अंजलीने खोचला पदर! - जळगाव तृतीयपंथी अंजली न्यूज

भादली बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अंजलीने वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला. तृतीयपंथी असल्याने तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने तिला निवडणूक लढण्याची संधी दिली.

जळगाव भादली ग्रामपंचायत निवडणूक न्यूज
जळगाव भादली ग्रामपंचायत निवडणूक न्यूज
author img

By

Published : Jan 7, 2021, 6:12 PM IST

जळगाव - राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत सर्वाधिक चर्चा आहे, ती जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक गावातील एका तृतीयपंथी उमेदवाराची. अंजली (गुरू संजना जान) असे या तृतीयपंथी उमेदवाराचे नाव असून, सध्या ती प्रचारात गुंतली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगून ती निवडणुकीच्या आखाड्यात प्रतिस्पर्धी उमेदवारांशी दोन हात करायला उतरली आहे. 'सर्वसामान्य जनतेचे हीत' हा एकमेव अजेंडा घेऊन ती लोकांसमोर मतांचा जोगवा मागत आहे. प्रचारादरम्यान, लोकांचे मिळणारे प्रेम पाहून आपला आत्मविश्वास दुणावला असून, विजय निश्चित असल्याचा तिचा दावा आहे.

जळगाव भादली ग्रामपंचायत निवडणूक न्यूज
जळगाव भादली ग्रामपंचायत निवडणूक न्यूज
गावाच्या विकासासाठी 'तृतीयपंथी' अंजलीने खोचला पदर!

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अंजली हिने वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला. तृतीयपंथी असल्याने तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजलीने हार मानली नाही. तिने आपली सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील हिच्या मदतीने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने तिचा न्याय मिळाला. न्यायालयाने तिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. म्हणून शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तिची उमेदवारी मान्य करावी लागली. निवडणूक प्रक्रियेत आता प्रचाराचा टप्पा सुरू असून, अंजली प्रचाराच्या कामात गुंतली आहे.

हेही वाचा - भादलीच्या 'त्या' तृतीयपंथीला न्यायालयाचा दिलासा; स्त्री राखीव प्रवर्गातून उमेदवारीला मिळाली मान्यता

जिल्ह्यात अंजलीच्या उमेदवारीची चर्चा

भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अंजली या तृतीयपंथीने अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. अंजली निवडणुकीत काय करिष्मा करते? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भादली बुद्रुकच्या ग्रामस्थांनाही अंजलीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आजवर गावाने अनेक निवडणुका पाहिल्या. अनेकांनी विकासाची स्वप्ने दाखवून मते घेतली, निवडूनही आले. पण गाव आहे तसेच आहे. त्यामुळे अंजली आपल्यासाठी काहीतरी करेल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे.

जळगाव भादली ग्रामपंचायत निवडणूक न्यूज
जळगाव भादली ग्रामपंचायत निवडणूक न्यूज
गरजेवेळी मदतीला धावून येणारी अंजली

अंजली ही संपूर्ण गावाला परिचित व्यक्ती आहे. तृतीयपंथी असल्याने तिच्याकडे पाहण्याचा ग्रामस्थांचा दृष्टिकोन नकारात्मक मुळीच नाही. ती गरजेच्या वेळी नेहमी मदतीला धावून जाते. विशेष करून, ती नेहमी वृद्धांच्या सेवेत असते. कुणाचे आजारपण असो किंवा कुणाचे शासकीय कार्यालयातील कागदपत्रांचे काम असो, कुणी हाक दिली की मदतीला जाणे हाच अंजलीचा माणुसकी धर्म. म्हणूनच तिच्या उमेदवारीचे स्वागत होत आहे. बहुमताने ती निवडून येईल, अशी खात्री अंजलीच नाही तर, खुद्द मतदार ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी माझा लढा

आपल्या उमेदवारी संदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अंजली पाटील यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे गावाचा विकासच झालेला नाही. पाणी, स्वच्छता अशा मूलभूत सुविधाही ग्रामस्थांना मिळत नाहीत. ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी माझा लढा असणार आहे. मी निवडून आल्यानंतर सर्वात आधी ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. स्वतःचा आत्मविश्वास आणि लोकांचे प्रेम याच्या पाठबळावर मी उमेदवारी केली आहे. समोर प्रतिस्पर्धी कोण आहे, याचा विचार न करता मी काय करू शकते, हे मला चांगले माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुरोगामी महाराष्ट्रात माणूसपण जपले जावे, हीच अपेक्षा - शमिभा पाटील

अंजली यांच्या उमेदवारीसाठी न्यायालयीन लढा लढणाऱ्या शमिभा पाटील यावेळी म्हणाल्या की, अंजली यांच्या उमेदवारी संदर्भात आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळाला. त्यानंतर तृतीयपंथी समुदायाच्या बाबतीत सर्वच राजकीय पक्षांकडून सकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहेत. ही आमच्यासाठी खूपच अभिमानाची बाब आहे. अंजलीच्या लढ्यात तिच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्यच होते. आतापर्यंत आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले गेले. पण आम्हीही याच मुख्य प्रवाहाचे घटक आहोत, हे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर यापुढच्या काळात अनेक निवडणुका होणार आहेत, त्यात तृतीयपंथी व्यक्तीला देखील महिला (तृतीयपंथी) म्हणून उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, अशा भावना शमिभा पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावरून जळगाव तहसील कार्यालयात गोंधळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.