जळगाव- जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच आहे. मंगळवारी पुन्हा जिल्ह्यात ४० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ हजार ८५१ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आजपर्यंत एकूण १४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात ४० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ३, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ८, अमळनेर ६, पाचोरा २, भडगाव २, धरणगाव ३, यावल १, जामनेर १, रावेर ७ आणि पारोळा ६ अशा नवीन रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील बळींची संख्या १४९...
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी एकूण ६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात यावल, जळगाव तालुका, जामनेर, धरणगाव व एक चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारी एकूण ८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत एकूण ९४७ रुग्ण बरे झाले आहेत. १४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, ७५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळवली आहे.
कोरोना अपडेट...
जळगाव शहर- ३२७, भुसावळ-३२७, अमळनेर-२३६, चोपडा- १४१, पाचोरा-४५, भडगाव- ९५, धरणगाव- ९१, यावल- ९८, एरंडोल- ५६, जामनेर- ८६, जळगाव ग्रामीण-५७, रावेर- १४०, पारोळा-९९, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर- १५, बोदवड-१४, इतर जिल्ह्यातील-६, एकूण- १८५१