ETV Bharat / state

गोडाऊन फोडून लाखो रुपयांचे टायर चोरणाऱ्यास अटक; उस्मानाबादमधून आवळल्या मुसक्या - jalgaon crime branch

चोरट्यांनी गोडाऊनमधील नवीन टायर, रेडीयल टायर व ११ हजार रुपयांची रोकड असा २३ लाख २० हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. संशयिताची माहिती देणाऱ्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस पोलीस दलाने जाहीर केले होते. या प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानाबाद येथून एकास अटक केली आहे.

जळगाव पोलीस
जळगाव पोलीस
author img

By

Published : Oct 3, 2020, 6:09 PM IST

जळगाव - पाळधी येथील एका टायरच्या गोडाऊनमधून २३ लाख २० हजार ५७० रुपयांचे टायर, रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरीला गेले होते. ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली होती. या प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानाबाद येथून एकास अटक केली आहे. अनिल बिसाराम शिंदे (४५, रा. तेरखेडा, ता.वाशी, जि.उस्मानाबाद) असे या चोरट्याचे नाव आहे.

अनिल शिंदे हा स्वत: ट्रकमालक व चालक आहे. तसेच या गुन्ह्यात त्याच्यासोबत आणखी पाच ते सहा साथीदार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीचे पलोड डिस्ट्रीब्युटर्स नावाचे पाळधीत गोडाऊन आहे. गोडाऊनमध्ये सदाशिव निंबा मराठे हे डेपो इन्चार्ज म्हणून काम करतात. ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री दोन ट्रक घेऊन चोरटे गोडाऊनच्या मागच्या बाजूस आले. चोरट्यांनी गोडाऊनच्या खिडकीची काच फोडून, लोखंडी अँगल वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गोडाऊनमधील नवीन टायर, रेडीयल टायर व ११ हजार रुपयांची रोकड असा २३ लाख २० हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पहाटे चार वाजेनंतर सर्व चोरटे ट्रकमधुन पळुन गेले. दरम्यान, यातील केवळ एका चोरट्याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाले होते. त्यावरुन पोलिसांनी स्केच तयार केले. संशयिताची माहिती देणाऱ्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस पोलीस दलाने जाहीर केले होते.

दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार डॉ. मुंढे यांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. माहिती पक्की असल्याचे खात्री होताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, रामकृष्ण पाटील, सुधारक अंभोरे, जितेंद्र पाटील, अशरफ शेख, अनिल देशमुख, इद्रीस पठाण, विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांचे पथक उस्मानाबादकडे रवाना झाले. या पथकाने शिंदे याला तेरखेडा या त्याच्या गावातून अटक केली. पुढील तपासासाठी त्याला धरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.