ETV Bharat / state

जळगावात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची गळफास घेऊन आत्महत्या; डॉक्टर, मजूर, विवाहितेचा समावेश - जळगाव पोलीस लेटेस्ट न्यूज

शहर व परिसरात काल रात्री व आज वेगवेगळ्या घटनांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरसह तिघा जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत. यात मोहाडी परिसरातील मजूर व पिंप्राळा हुडकोतील विविहितेचा देखील समावेश आहे. आत्महत्यांची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.

जळगाव आत्महत्या न्यूज
जळगाव आत्महत्या न्यूज
author img

By

Published : Dec 11, 2020, 8:02 PM IST

जळगाव - शहर व परिसरात काल रात्री व आज वेगवेगळ्या घटनांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरसह तिघा जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत. यात मोहाडी परिसरातील मजूर व पिंप्राळा हुडकोतील विविहितेचा देखील समावेश आहे.

शहरातील महाबळ परिसरातील डॉक्टर विद्याधर लीलाधर पाटील (वय ३८) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. डॉ. विद्याधर (मूळ रा. साळवा, ता. धरणगाव, नांदेड) यांच्या पत्नी नागपूर येथे आरोग्य विभागात नोकरीस असल्याने ते घरी एकटेच राहत होते. त्यांचा मोबाईल दोन दिवसांपासून बंद येत होता. तसेच त्यांच्या घराचा दरवाजादेखील बंद असल्याने नातेवाईकांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली. पाटील यांनी छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आल्याने नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला.

जळगाव आत्महत्या न्यूज
डॉ. विद्याधर लीलाधर पाटील

हेही वाचा - लालबाग सिलेंडर स्फोट प्रकरणी दोन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

आत्महत्येचे गूढ कायम

डॉ. विद्याधर पाटील हे पूर्वी बीव्हीजीत नोकरीस होते. वर्षभरापूर्वी त्यांनी बदली शासकीय रुग्णालयात झाली असून ते १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेत डॉक्टर असल्याचे समजते. डॉ. पाटील यांनी आत्महत्या करण्याइतपत टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे

परप्रांतीय मजुराची गळफास घेवून आत्महत्या

तालुक्यातील मोहाडी शिवारात कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री समोर आली. भिकूकुमार सिंह नंदलाल (वय २४, रा. जैन नगर मोहाडी शिवार, मूळ राहणार झारखंड) असे मृत मजुराचे नाव आहे.

भिकुकुमार हा तरुण शहरातील एमआयडीसीतील आरएमसी प्रपोर्शन बिल्डकॉन येथे गेल्या महिन्याभरापासून काम करत होता. बांधकामाच्या ठिकाणी एका पत्र्याच्या खोलीत तो इतर मजूरांसह राहत होता. नेहमीप्रमाणे बांधकामाचे काम आटोपल्यानंतर भिकूकुमार हा गुरुवारी सायंकाळी ७ वाजता खोलीवर गेला. गुरुवारी सायंकाळी खोलीत कोणीही नव्हते. भिकूकुमार याने कापडाने गळफास घेवून आत्महत्या केली. रात्री सहकारी मजूर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन केल्यानतंर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पिंप्राळा हुडकोत विवाहितेची आत्महत्या

शहरातील पिंप्राळा हुडको येथील विवाहितेने मध्यरात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीला आला. सुवर्णा आनंद चौधरी (वय २५) असे विवाहितेचे नाव आहे. आनंद श्रावण चौधरी हे पत्नी सुवर्णा, आई इंदूबाई आणि दोन मुलांसह येथे राहतात. आनंद चौधरी हे व्यवसायाच्या निमित्ताने धुळे येथे कामासाठी गेले होते. घरी पत्नी सुवर्णा आणि त्यांची सासू इंदूबाई होत्या. मध्यरात्री सुवर्णा चौधरी यांनी सर्वजण झोपले असताना दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी इंदूबाई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा - पंढरपूर : चाळीस लाखांची सुपारी घेऊन जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या चौघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.