ETV Bharat / state

जळगाव : निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री; एकमेकांवरील सशस्त्र हल्ल्यात तिघे गंभीर

निवडणुकीच्या वादातून निकालानंतर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही गटातील सदस्य एकमेकांनी लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड तसेच तलवारीने हल्ले केले. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

author img

By

Published : Jan 20, 2021, 9:10 AM IST

Updated : Jan 20, 2021, 9:23 AM IST

निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री
निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री

जळगाव - चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री झाली. दोन्ही गटातील सदस्य एकमेकांनी लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड तसेच तलवारीने हल्ले केले. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून 34 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काय आहे घटना?

चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे या गावात प्रकाश निळकंठ पाटील यांच्या पॅनेलने नऊपैकी आठ जागांवर विजय मिळवला. यानंतर प्रकाश पाटील हे गावातील मतदारांकडे जाऊन औक्षण करून घेत होते. याच दरम्यान, पाटील यांच्या विरोधात असलेल्या पॅनलच्या लोकांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या, तलवारीने प्रकाश पाटील यांच्या गटातील लोकांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात संतोष पाटील, सोमसिंग पाटील, योगेश पाटील, मंगलसिंग पाटील, मानसिंग पाटील, संजय पाटील, अमरसिंग पाटील, केतनसिंग पाटील, भगवान पाटील, सुमेरसिंग पाटील, हेमंत पाटील, निलेश पाटील, विजयसिंह पाटील, अरुण पाटील, लखनसिंग पाटील, कुणाल पाटील, महेंद्र पाटील, महेश पाटील, रवींद्र पाटील, भूषण पाटील, बिजेसिंग पाटील, अजयसिंग पाटील व देवराज पाटील या 23 जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गटातील 23 जणांपैकी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे.

निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री
दुसऱ्या गटातील 5 जणांविरुद्ध गुन्हा-याच घटनेप्रकरणी मानसिंग देवसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुसऱ्या गटातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले प्रकाश पाटील व त्यांच्या समर्थकांनी आपल्या घरासमोर फटाके फोडत चिथावणीखोर घोषणा दिल्या. याचा जाब विचारल्याने संशयित आरोपींनी सशस्त्र हल्ला केल्याचा उल्लेख मानसिंग पाटील यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी प्रकाश पाटील, वंदना पाटील, सुरेखा पाटील, जयसिंग पाटील व रवींद्र पाटील या पाच जणांविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वकिलाच्या घरावरही झाला हल्ला-

या घटनेत एका वकिलाच्या घरावरही हल्ला झाला. आरोपींनी ऍड. हर्षल सुरजसिंग पाटील यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अॅड. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Jan 20, 2021, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.