ETV Bharat / state

धावत्या रेल्वेत मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांना अटक

रेल्वे प्रवासादरम्यान व रेल्वे स्थानकाच्या परिसरातून मोबाईल चोरी प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून तिघांकडूनही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

मोबाईल परत करताना पोलीस
मोबाईल परत करताना पोलीस
author img

By

Published : Sep 20, 2020, 8:33 PM IST

भुसावळ (जळगाव) - प्रवासात रेल्वे प्रवाशाचे लक्ष नसताना तसेच दरवाजाजवळ उभे असताना काठीने हातावर मारत मोबाईल लांबवण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचे तीन मोबाईल जप्त केले. तसेच एका गुन्ह्यात जप्त मोबाईल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला परत देण्यात आला.

दरम्यान, रेल्वे प्रवासात होणाऱ्या चोऱ्या पाहता लोहमार्ग पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 11058 अप पठाणकोट एक्स्प्रेसने भुसावळ ते जळगाव प्रवास करत असलेल्या निलेश जगन्नाथ वाणी (रा. संतोषी डेअरीजवळ, जळगाव) आऊटरजवळ गाडी आली असता आरोपी राहुल देवीदास तायडे (रा. शेगाव, जि.बुलढाणा) याने हाताला काठी मारत 58 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तो तक्रारदार वाणी यांना नुकताच परत करण्यात आला.

अहमदाबाद-यशवंतपूरच्या एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक चारमधील बर्थ क्रमांक 56 वरून नंदुरबार ते जळगाव प्रवासी करीत असलेल्या अतुल रामदास बठेजा (रा. आदर्श नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हे जळगाव येथे उतरत असताना चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. 14 सप्टेंबरला ही घटना घडली होती. या प्रकरणी विनोद मोरेश्वर ईडी (वय 47 वर्षे, रा. खालचे गाव, ब्रह्मटेक, बालाजी मंदिरामागे, ता. शिरपूर, जि.धुळे) या आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन न्हावकर, हवालदार नितीन पाटील, भरत शिरसाठ यांनी केली.

बुकींग खिडकीवरून मोबाईल लांबवला

भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकींग खिडकीवर तिकीट काढण्यासाठी तक्रारदार आशा प्रकाश रंभाळे (वय 25 वर्षे, रा. धम्मदीपनगर, विश्‍वशांती बुद्धनगरजवळ, नागपूर) या 6 जानेवारीला आल्या असता चोरट्यांनी त्यांचा 10 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी देवेंद्र खुशाल भगतकर (वय 21 वर्षे, रा. बांग्लादेश, गुप्ता चौक, नागपूर) यास नागपूर येथून अटक करण्यात आली व आरोपी ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मनिषा गजभिये, पोलीस शिपाई आशू शेट्टीयार, अमरदीप डोंगरे आदींनी केली.

हेही वाचा - लढा कोरोनाशी : जळगावात 'स्मार्ट हेल्मेट'द्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.