ETV Bharat / state

District Sarpanch Meet : निवडणुकांचा वाढता खर्च ही लोकशाहीतील मोठी अडचण - पोपटराव पवार

लोकप्रतिनिधीची निवड गुणवत्ता ही त्याच्या भरीव विकास कामांवर ठरत होती. मात्र, आजच्या काळात ती तुम्ही निवडणुकीत खर्च किती करू शकतात यावर ठरते, असे मत आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे. ( District Sarpanch Meet jalgaon ) सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जळगावात आयोजित जिल्हा सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.

author img

By

Published : Dec 13, 2021, 8:32 AM IST

arpanch Meet : निवडणुकांचा वाढता खर्च ही लोकशाहीतील मोठी अडचण - पोपटराव पवार
पोपटराव पवार

जळगाव - लोकप्रतिनिधीची निवड गुणवत्ता ही त्याच्या भरीव विकास कामांवर ठरत होती. मात्र, आजच्या काळात ती तुम्ही निवडणुकीत खर्च किती करू शकतात यावर ठरते, असे मत आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे. (District Sarpanch Meet 2021) सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जळगावात (Popatrao Pawar Speech Jalgaon ) आयोजित जिल्हा सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.निवडणूक ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी असावी, असही यावेळी ते म्हणाले आहेत.

व्डिडिओ

टीका टीपण्णी करण्यापेक्षा समन्वयाने काम करा

पोपटराव पवार यांनी या मनोगतातून आजच्या निवडणुकीत पैसा खर्च करुन विजयी होणार्‍यांना टोला लगावला असल्याचे बोलले जात आहे. पैसा ही विकासासाठी समस्या नाही, गावाचा विकास करण्यासाठी मानसिकता नसणे ही मोठी समस्या आहे. टीका टीपण्णी करण्यापेक्षा, इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा समन्वयाने काम करा असा सल्लाही त्यांनी दिली आहे. (Gulabrao Patil Sarpanch on Parishad Jalgaon ) जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिघांनी एकत्र येवून काम केले तरच स्वावलंबी गाव आणि बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करु शकतो, असेही हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले आहेत.

केवळ चेकवर स्वाक्षरी करायला मिळते, म्हणून सरपंच बनू नका

जिंकला की हवेत उडायच नाही, आणि हरलाच तर नैराश्यामध्ये जायचे नाही. गावात महापुरूषांचे पुतळे नाहीत. महापुरूषांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणावेत, पक्ष, पद बाजूला ठेवून संस्काराच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. केवळ चेकवर स्वाक्षरी करायला मिळते, म्हणून सरपंच बनू नका. काही उद्देश ध्येय डोक्यासमोर ठेवा. तर तुम्हीसुध्दा तुमचे गावाचा हिवरे बाजारप्रमाणे विकास घडवू शकता. गावाचे नेतृत्व हा सरपंच करत असतो. सरपंचाने सर्वांना सोबत घेवून शासनाच्या योजना लोहसहभागातून राबविल्या तर प्रत्येक गाव स्वावलंबी होईल असेही पोपटराव पवार म्हणाले.

हेही वाचा - MHADA Paper Leak : यापुढे म्हाडा स्वत: परीक्षा घेणार - जितेंद्र आव्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.