ETV Bharat / state

विश्वासघात कोण करतंय, हे जनतेला माहित आहे; गुलाबराव पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर - Matri Gulabrao Patil Latest News

विश्वासघात कोण करत आहे, हे दिल्लीत जनता बघत आहे. एमएसपी संदर्भात शेतकऱ्यांची छोटीशी मागणी आहे. देवेंद्र फडणवीस हे पण शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्या मागणीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असं वक्तव्य पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Matri Gulabrao Patil Latest News
गुलाबराव पाटील
author img

By

Published : Dec 25, 2020, 8:56 PM IST

जळगाव- विश्वासघात कोण करत आहे, हे दिल्लीत जनता बघत आहे. एमएसपी संदर्भात शेतकऱ्यांची छोटीशी मागणी आहे. देवेंद्र फडणवीस हे पण शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्या मागणीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, उगाचच कुणावरही टीका करू नये, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या नियोजनासाठी शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने जळगावात जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक आटोपल्यानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला होता. फडणवीस यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावात प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला.

शेतकऱ्यांचा मागणीसाठी फडणवीसांनी पुढाकार घ्यावा-

देवेंद्र फडणवीस यांनी केवळ टीका न करता शेतकऱ्यांचा मागण्यांबाबत पुढाकार घेतला पाहिजे. ते देखील शेतकऱ्यांचे नेते असून, केवळ टीका करण्यात वेळ वाया घालू नये. शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम करावे. शेतकरी हा सर्वात मोठा पाया आहे. तो कोणत्या पक्षाचा किंवा जातीचा नाही. शेतकऱ्यांच्या पोटाला जात नसते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी काढला.

विश्वासघात कोण करतंय, हे जनतेला माहित आहे

सुनील झंवर माझे मित्र आहेत आणि राहतील-

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर यांच्यावर आरोप होत असल्याने, झंवर यांच्यासोबतचे संबंध सर्व जण लपवत आहेत. असे असताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र, सुनील झंवर हे माझे मित्र आहेत आणि राहतील, असं वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. सुनील झंवर हे माझ्या गावाचे आहेत, आणि गावाचा माणूस हा मित्रच काय तर तो एक नातेवाईकासारखाच असतो. कोण कोणाचा मित्र असू नये किंवा असावा हे काय वरून ठरत नसते. सुनील झंवर हे माझे मित्र होते, आहेत आणि भविष्यात देखील राहणार, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.