जळगाव - वित्त आयोगाच्या रकमेत कपात करण्यात येऊ नये यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सरपंच आक्रमक झाले आहेत. अनेकदा शासनाची लक्ष वेधूनही मागण्या होत नाही. त्यामुळे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवणार असल्याचा इशारा सरपंच परिषद मुंबईचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
सरपंच परिषद मुंबई आणि जळगाव यांच्यावतीने जळगाव येथे सरपंच मेळावा आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आदी उपस्थित होते.
व्यासपीठावरुन सभेला संबोधित करताना काकडे यांनी विविध मागण्यांकडे मंत्री, खासदार, आमदारांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, आम्ही आमच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरवठा करत आहेत. अद्याप मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. आम्ही राज्य सरकारला अल्टिमेटम देत आहोत की, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास चर्चेनंतर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायत एक दिवस बंद ठेवण्याचा इशारा काकडे यांनी दिला.
हे ही वाचा - VIDEO : जळगाव जिल्ह्यात अनोखा विवाह.. मृत वडिलांच्या पुतळ्याला साक्षी मानत मुलीने घेतले सात फेर