जळगाव - जिल्ह्याला हॉट सिटी म्हणून ओळख आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळगाव शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
होळीनंतर हळुहळु तापमानात वाढ होत असते. मात्र, यंदा अवकाळी पाऊस झाल्याने तापमानात बदल झाला आहे. बुधवारी (दि. 16 मार्च) हा पारा 43 अंशाच्या पार गेल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे जिल्हा क्रीडा संकुल परिसरात शुकशुकाट पाहावयास मिळाला. रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी बाजारात टोप्या, रुपाल, स्कार्फ उपलब्ध झाले आहे.
उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नागरीकांची थंड पेयाच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या ऊन्हामुळे दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत आहेत. दुपारी नागरिक घरातच राहणे पसंत करत असून सर्वानीच काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - Chickens died In Jalgaon : जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव तालुक्यात अचानक २५ कोंबड्यांचा मृत्यू