ETV Bharat / state

Tamasha Artists Commit Suicide : धक्कादायक : तमाशा कलावंत तरुण-तरुणींची विष प्राशन करून आत्महत्या - Jalgaon Tamasha artiste commits suicide

भिका नाम तमाशा मंडळमधील २० वर्षीय तरुणीची व एकोणीस वर्षे तरुणाने काही एक कारण न सांगता विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या ( Tamasha artists commit suicide in Jalgaon ) केली असल्याची घटना आज पारोळा शहरात घडली आहे.

Tamasha Artists Commit Suicide
तमाशा कलावंत तरुण-तरुणींची आत्महत्या
author img

By

Published : Feb 26, 2022, 12:13 PM IST

जळगाव - भिका नाम तमाशा मंडळमधील २० वर्षीय तरुणीची व एकोणीस वर्षे तरुणाने काही एक कारण न सांगता विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली असल्याची घटना पारोळा शहरात घडली आहे.

Tamasha artists commit suicide in Jalgaon
योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे

मच्छी आणायला जातो सांगून केले घरातून -

भिका नाम तमाशा मंडळ हे धुळे जिल्ह्यातून बाबुळवाडी येथून येथे दि २४ रोजी दुपारी तमाशाचे काम आटपून दुसऱ्या ठिकाणी जात होते. धुळ्यातील कजगाव रोडवर पेट्रोल पंपाजवळ गाडी खराब झाल्याने शहरात थांबलेले होते. तमाशा मंडळामधील तरुणी अंजली अशोक नामदास (वय २० रा दत्त कॉलनी, ता भुसावळ) व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे (वय १९ रा राहणार अंजाळे ता यावल) हे दोन्ही तमाशा मंडळामध्ये नाच काम करतात. यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, मच्छी बाजारात जाऊन येतो. असे सांगून दोन्ही जण निघून गेले ते लवकर न आल्याने मंडळातील अन्य सहकाऱ्यांनी शोध घेतला. ते मच्छी बाजारात होते त्यावेळी त्यांना विचारपूस केली असता एवढा वेळ का लागला त्यांनी सांगितले की, आम्ही दोघांनी काहीतरी विषारी औषध सेवन केले आहे. असे सांगितले असता त्यांना सहकाऱ्यांनी लगेच एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यानंतर शुक्रवारी पुढील उपचारार्थ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता अंजली हिची दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालावली. तर योगेश याचा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली आहे. याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसात माहिती दिली.

अंजली अशोक नामदास

तमासगिरी मंडळातून केली जातेय हळहळ व्यक्त -

या दोन्ही तमाशा मंडळामधील कलावंतांनी काहीतरी विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. यांच्या मृत्यूने तमासगिरी मंडळात एकच शांतता पसरली होती. याबाबत यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही, परंतू दोघांची एकमेकाशी घट्ट मैत्री होती असे बोलले जात होते.

हेही वाचा - Paper Leak Scam : पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गोपीचंद सानपला पुणे पोलीसांनी केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.