ETV Bharat / state

प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा दोन दिवसातच संशयास्पद मृत्यू; घातपाताचा आरोप

दोन दिवसांपूर्वीच पतीसह सासरी गेलेल्या या तरुणीचा गुरुवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. आज (शुक्रवारी) ही घटना समोर आली. आरती विजय भोसले (२०, रा. पाळधी) असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, विवाहितेच्या माहेरच्यांनी तरुणीचा घातपात झाल्याचा आरोप करत विवाहितेचा पती, त्याचे मित्र व सासरच्या लोकांना अटक करण्याची मागणी केली.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Jan 1, 2021, 7:57 PM IST

जळगाव - शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या पाळधी येथील एका तरुणीचा गावातीलच तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. दोन दिवसांपूर्वीच पतीसह सासरी गेलेल्या या तरुणीचा गुरुवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. आज (शुक्रवारी) ही घटना समोर आली. आरती विजय भोसले (२०, रा. पाळधी) असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, विवाहितेच्या माहेरच्यांनी तरुणीचा घातपात झाल्याचा आरोप करत विवाहितेचा पती, त्याचे मित्र व सासरच्या लोकांना अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा तरुणीच्या माहेरच्या लोकांनी घेतल्याने शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

जळगाव

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पाळधी येथील आरती भोसले ही तरुणी ६ डिसेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता झाली होती. त्यामुळे आरतीच्या कुटुंबीयांनी पाळधी पोलिसात हरविल्याची नोंद देखील केली होती. पोलिसांसह कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरू असतानाच दि. २९ डिसेंबर रोजी आरती ही पाळधी गावातीलच प्रशांत विजयसिंह पाटील या तरुणासोबत विवाह करून गावात परतली. आरती व प्रशांत हे दोघे पाळधी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यांनी आपण प्रेमविवाह केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. दोन्ही कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर आरती त्याच दिवशी पती प्रशांतसोबत पाळधी येथील प्रशांतच्या घरी अर्थात सासरी गेली होती.

दोनच दिवसात संशयास्पद मृत्यू-

आरतीला सासरी जावून अवघे दोन दिवस झाले होते. त्यानंतर आज, शुक्रवारी सकाळी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले. आरतीच्या मृत्यूची बातमी तिचा पती प्रशांत याच्या मित्राने आरतीच्या आई-वडिलांना दिली. ही बातमी मिळताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरात आरतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

घातपात केल्याचा आरोप; शासकीय रुग्णालयात तणाव

ही घटना समोर आल्यानंतर आरतीचा मृतदेह सकाळी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. आपल्या मुलीचा घातपात झाला असून, तो तिचा पती, त्याचे वडील व मित्रांनीच केल्याचा आरोप आरतीच्या माहेरच्यांनी केला. तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोपही वडिलांनी केला आहे. दरम्यान, आरतीचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते, त्यामुळे हा घातपात आहे. त्यामुळे संबंधितांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत त्यांनी संताप व्यक्त केला. दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री आरतीचा पती आणि त्याच्या मित्रांनी घरात थर्टीफर्स्टची पार्टी केली. त्यानंतर मुलीचा घातपात केला आहे, असा आरोप करण्यात आला. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा आरतीच्या कुटुंबीयांनी घेतला होता. यामुळे काही वेळ रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

पती व मित्र ताब्यात; माहेरच्यांनी स्वीकारला मृतदेह

मृत विवाहितेच्या कुटुंबीयांचा संताप लक्षात घेत दुपारी पाळधी पोलीस ठाण्याचे एपीआय हनुमंतराव गायकवाड हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी कुटुंबीयांची समजूत घालत आरतीचा पती व त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यानंतर मृत विवाहितेच्या वडिलांनी मृतदेह स्वीकारला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मृतदेह पाळधी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.