ETV Bharat / state

सुप्रिया सुळे झाल्या वृत्त निवेदिका; उपमुख्यमंत्री अजित पवारांची दिली बातमी - अजित पवार

खासदार सुप्रिया सुळे यांनी मास मीडिया विभागाच्या व्हिडिओ स्टुडिओची संपूर्ण रचना समजून घेतली. त्यांनी न्यूज अँकरचे काम कसे असते, न्यूज अँकर टेलिप्रॉम्प्टरवर बातमी कशी वाचतो, बातमी वाचताना आवाजाचा लय कसा ठेवावा, असे मुद्दे जाणून घेतले. त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांशी निगडित शेतकरी कर्जमाफीची एक राजकीय बातमी वाचून दाखवली.

खासदार सुप्रिया सुळे न्यूज अँकर म्हणून बातमी वाचताना

author img

By

Published : Feb 28, 2020, 12:19 PM IST

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क न्यूज अँकर म्हणून न्यूज स्टुडिओत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बातमी दिली. ऐकून धक्का बसला ना, पण हे अगदी खरं आहे. सुप्रिया सुळेंनी जळगाव दौऱ्यावर असताना शुक्रवारी येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील 'सेंटर फॉर मास मीडिया अँड फॉरेन लँग्वेज' विभागाला भेट दिली. यावेळी व्हिडिओ स्टुडिओची रचना समजून घेताना त्यांना न्यूज अँकर म्हणून बातमी देण्याचा मोह आवरता आला नाही.

खासदार सुप्रिया सुळे न्यूज अँकर म्हणून बातमी वाचताना

खासदार सुप्रिया सुळे यांनी मास मीडिया विभागाच्या व्हिडिओ स्टुडिओची संपूर्ण रचना समजून घेतली. त्यांनी न्यूज अँकरचे काम कसे असते, न्यूज अँकर टेलिप्रॉम्प्टरवर बातमी कशी वाचतो, बातमी वाचताना आवाजाचा लय कसा ठेवावा, असे मुद्दे जाणून घेतले. त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांशी निगडित शेतकरी कर्जमाफीची एक राजकीय बातमी वाचून दाखवली.

हेही वाचा - जळगावातील नामांकित उद्योग समूहावर प्राप्तीकर विभागाचे छापे; विविध आस्थापनांचीही चौकशी

राजकारणात सक्रिय असताना नेहमी पत्रकार आमच्या बातम्या देत असतात. मात्र, न्यूज अँकर म्हणून स्वतः बातमी देण्याचा मला मोह आवरता आला नाही. व्हिडिओ स्टुडिओत न्यूज अँकर म्हणून बातमी देणं हा अनुभव माझ्यासाठी निश्चितच आनंददायी होता, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

हेही वाचा - फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे 'टरबूज फोडो' आंदोलन...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.