ETV Bharat / state

कॉपीचा ठपका ठेवल्याने विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

कॉपीबाबात म्हणणे मांडण्यासाठी विद्यापीठात तिला बोलविले होते. पण, तणावात तीने आपले जीवन संपविले.

अंकिता बाविस्कर
अंकिता बाविस्कर
author img

By

Published : Feb 12, 2020, 8:43 PM IST

जळगाव - रावेर तालुक्याच्या पाल येथील सातपुडा विकास मंडळ, महाविद्यालयातील विद्यार्थिनीने कॉपीचा ठपका ठेवल्याच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केली आहे. अंकिता सुपडू बाविस्कर (वय 19), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, अंकिता ही घरातील मागच्या खोलीत आजीसोबत मंगळवारी (दि. 11 फेब्रुवारी) रात्री झोपी गेली होती. त्यानंतर तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच याबाबत रोवेर पोलिसांत घरच्यांनी तक्रार दिली. अंकिता ही विज्ञान शाखेतील पदवीचे शिक्षण घेत होती. 9 नोव्हेंबर, 2019 रोजी प्रथम वर्षातील प्रथम सत्राच्या मायक्रोबियल डिव्हरसिटी अल्गी विषयाच्या पेपरला कॉपी केल्याचा आरोप होता.

याबाबत म्हणणे मांडण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने तिला 25 जानेवारी, 2020 रोजी बोलविले होते. पण, तणावात असल्याने ती म्हणणे मांडायला गेली नाही. याच तणावातून तिने आपली जीवन यात्रा संपविल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - जळगावात चार वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू, 14 वर्षीय मुलगी ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.