ETV Bharat / state

Sharad Pawar On Maratha Reservation : ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण द्या, शरद पवारांनी सुचवला 'हा' तोडगा - ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण

Sharad Pawar On Maratha Reservation : ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी शरद पवार यांनी जळगावात बोलताना केली. यावेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर तोडगा सुचवला आहे. केंद्र सरकारनं यावर आरक्षण वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Sharad Pawar On Maratha Reservation Raw
राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 12:07 PM IST

Updated : Sep 5, 2023, 12:44 PM IST

जळगाव Sharad Pawar On Maratha Reservation : सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मात्र ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण दिल्यास पुन्हा जटील प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता, मराठा आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी जळगाव इथं केली. शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याचं शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केलं.

ओबींसीच्या आरक्षणाला हात लावू नका : जालना इथं मराठा आंदोलकांवर सरकारनं लाठीहल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिल्यास पुन्हा जटील प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला हात न लावता, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. इतर मागासवर्गीय समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. असा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीचा त्याला पाठिंबा असणार नसल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला हात न लावता, आरक्षण वाढवून देण्याची मागणीही शरद पवार यांनी केली.

मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला कोणी केला, स्पष्टीकरण द्यावं : सरकारनं मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत मंत्रालयातून आदेश देण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीर गटानं मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर, मंत्रालयातून फोन करुन आम्ही लाठीहल्ला केल्याचं सिद्ध करुन दाखवा, आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ, मात्र सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून बाहेर जावं, असा दमचं दिला होता. यावर शरद पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता, सरकारच्या वतीनं माफी मागितली, त्यातच सगळं आल्याची कोपरखळी पवार यांनी मारली. सरकारनं लाठीहल्ला केला नसल्यास लाठीहल्ला कोणी केला, याचं स्पष्टीकरण सरकारनं द्यावं, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

भीषण पाणी टंचाईनं शेतकऱ्यांची स्थिती बिकट : राज्यातील काही भागात अद्यापही पाऊस झाला नाही. त्यामुळे राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. काही ठिकाणी शेतकरी पंपानं शेतीला पाणी देत आहेत. सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला नाही, तर आगामी काळात राज्यातील जनतेला भीषण टंचाईचा सामना कराला लागणार असल्याचंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे सरकार काय उपाययोजना करते, याकडं पहावं लागेल, असंही ते म्हणाले.

केंद्र सरकार घटनेतून हटवणार 'इंडिया' : विरोधी आघाडीनं त्यांच्या आघाडीला 'इंडिया' हे नाव दिलं आहे. मात्र केंद्र सरकार विशेष अधिवेशनात 'इंडिया' हे नाव हटवून भारत हे नाव देणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र 'इंडिया' हे नाव कोणीही हटवू शकत नसल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar On Maratha Reservation : आंदोलकांवर बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, पवारांचं सरकारवर टीकास्त्र
  2. Maratha Reservation Protest : सत्तेवर असताना मराठ्यांना शरद पवार का न्याय देऊ शकले नाहीत?

Last Updated : Sep 5, 2023, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.