ETV Bharat / state

सातपुडा पर्वत रांगांमध्ये अतिवृष्टी, नागझिरी नदीच्या पुरात अडकलेल्या सात जणांची अखेर सुटका - nagziri river

पुराच्या पाण्यात ऐनपूर रस्त्यावर ७ ग्रामस्थ अडकून पडले होते. नदीला आलेल्या पुराचा जोर ओसरत नसल्याने अडकून पडलेल्या सातही जणांचा जीव धोक्यात होता. शेजारील गावाच्या ग्रामस्थांनी धाव घेत त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, साधने उपलब्ध नसल्याने बचावकार्यात अडथळे येत होते.

सातपुडा पर्वत रांगांमध्ये अतिवृष्टी
author img

By

Published : Jun 30, 2019, 2:16 PM IST

Updated : Jun 30, 2019, 2:35 PM IST

जळगाव - रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सातपुडा पर्वत रांगांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागझिरी नदीला पूर आला. या पुरात ७ जण अडकून पडले होते. सुदैवाने त्यांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

सातपुडा पर्वत रांगांमध्ये अतिवृष्टी, नागझिरी नदीच्या पुरात अडकलेल्या सात जणांची अखेर सुटका

सातपुडा पर्वत रांगांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने रावेर तालुक्यामधून वाहणाऱ्या नागझिरी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात ऐनपूर रस्त्यावर ७ ग्रामस्थ अडकून पडले होते. नदीला आलेल्या पुराचा जोर ओसरत नसल्याने अडकून पडलेल्या सातही जणांचा जीव धोक्यात होता. शेजारील गावाच्या ग्रामस्थांनी धाव घेत त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, साधने उपलब्ध नसल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. यामुळे ग्रामस्थांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली. मात्र, घटनास्थळी कुठलाही महसूल अधिकारी, तहसीलदार तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागासह पोलीस यंत्रणा आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

शेवटी पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रावेर पंचायत समिती सदस्य पी. के. महाजन, शेतकरी नाबीद खान, सचिन जाधव, योगेश महाजन हे धावून आले. त्यांनी दोर आणत पाण्यात उतरून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यामुळे अनुचित घटना टळली.

रावेर तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असून शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील लहान मोठ्या नद्यांसह नाले वाहत आहेत. तसेच पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे.

Intro:जळगाव
जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सातपुडा पर्वत रांगांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागझिरी नदीला पूर आला. या पुराच्या पाण्यात ७ ग्रामस्थ अडकून पडले होते. सुदैवाने त्यांना ग्रामस्थांच्या वतीने वाचविण्यात यश आल्याने अनर्थ टळला. दरम्यान, मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामांना वेग आला आहे.Body:सातपुडा पर्वत रांगांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने रावेर तालुक्यामधून वाहणाऱ्या नागझिरी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात ऐनपूर रस्त्यावर ७ ग्रामस्थ अडकून पडले होते. नदीला आलेल्या पुराचा जोर ओसरत नसल्याने अडकून पडलेल्या सातही जणांचा जीव धोक्यात आला होता. शेजारील गावाच्या ग्रामस्थांनी धाव घेत त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, साधने उपलब्ध नसल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. या प्रकाराची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, घटनास्थळी कुठलाही महसूल अधिकारी, तहसीलदार तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागासह पोलीस यंत्रणा आली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. शेवटी पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रावेर पंचायत समिती सदस्य पी.के. महाजन, शेतकरी नाबीद खान, सचिन जाधव, योगेश महाजन हे धावून आले. त्यांनी दोर आणत पाण्यात उतरून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यामुळे अनुचित घटना टळली.Conclusion:दरम्यान, रावेर तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असून शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील लहान मोठ्या नद्यांसह नाले वाहत आहेत.
Last Updated : Jun 30, 2019, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.