ETV Bharat / state

...अखेर नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच टाकला कचरा

शहरातील कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न समोर आला आहे. यातच सफाई कामगारांचे वेतन रखडल्याने पूर्ण गाड्याही बंद आहेत. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहे.

कचरा
कचरा
author img

By

Published : Jun 12, 2021, 1:08 PM IST

Updated : Jun 12, 2021, 1:19 PM IST

यवतमाळ - शहरात कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी यांनी कचरा उचलण्याचे निर्देश दिले तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचरा टाकून लक्ष वेधले.

नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच टाकला कचरा
आतापर्यंत स्वखर्चाने उचलला कचरानगरपालिकेमध्ये नवीन कचरा उचलण्याचे कंत्राट काढण्यात यावे यासंदर्भात ठराव घेण्यात आला. हा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्याप त्यावर कुठलाच निर्णय घेण्यात न आल्याने शहरातील कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न समोर आला आहे. यातच सफाई कामगारांचे वेतन रखडल्याने पूर्ण गाड्याही बंद आहेत. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहे. हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा यासाठी नगरसेवक उपोषणालाही बसले होते. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. कचरा असाच साचून राहिल्यास आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरसेवक स्वतः कचरा उचलण्यासाठी पैसे खर्च करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवकांनी दिला. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Last Updated : Jun 12, 2021, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.