जळगाव - माहेरी आलेल्या विवाहितेचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. यात १ लाख २२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. ही घटना शहरातील सुभाष चौकात आज २४ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पिशवी कापून सोन्याचे दागिने लंपास -
शहारातील पारख नगर येथील माहेर असलेल्या माला राकेशकुमार मालानी (वय-५३, रा. कालानीनगर, इंदौर मध्यप्रदेश) या जळगाव येथे भावाकडे भेटण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी आल्या. दुपारी माला मालानी या त्यांच्या भावजयीसोबत सुभाष चौकातील आरसी बाफना नयनतारा ज्वेलर्स येथे त्यांनी १ लाख २२ हजार ८०९ रूपये किंमतीचे ब्रासलेट व कानातील टॉप्स असे सोन्याचे दागिने खरेदी केले. त्यानंतर सिल्वर शोरूम येथे पोहचले.
हेही वाचा - राज्यात तरुण मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार; आकडेवारी चिंताजनक
दुकानावर पोहचताच त्यांना पिशवीत दागिने पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी पिशवी कापून सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले. विवाहितेच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अभिजित सैंदाणे करीत आहे.